सुषमा...तू नुक्कडला मिळालेली देणगी आहेस...काय लिहिते आहेस मुली...मला तुझा अभिमान आहे!
पिंपळ सावली – सुषमा जायभाये
पंचायतीपासून डाव्या बाजूला एक मैल दूर सटवाईचा जुना पिंपळ आहे, पिंपळाच्या गडद सावलीत सुसरीचा डोह अजूनच गडद झाल्यावर बुरजावरची संगी म्हशीच्या शेपटीला धरून सुसर डोहात गेली ते कधीच परत आली नाही.
नंतर सुसर डोहावर धुणं धुवायला गेलेल्या सुनेच्या अंगावरची माहेरातून आणलेली नवी साडी डोहावरच भागा म्हातारीने फेडून घेऊन तिच्या मुलीला दिली..
तेव्हा तिची सुन याच डोहात पाय घसरून मेली .
लहान असताना एकदा धुणं नेऊन देताना त्या डोहात मला बुडताना पाहून शंकरदाचा बाल्या देवासारखा धावून आला होता असं माई म्हणते.. .
तो डोह मला आता तुझ्या डोळ्यांत तरळताना दिसतोय...हल्ली तुझ्या डोळ्यांत मी का रोखून पाहत नाही हे तुला समजायला हव.