फुंकर अशीही आणि तशीही...पण फरक खूप आहे.
फुंकर – सुचिता घोरपडे
ती जेव्हा सिग्नलला उभी राहून फुग्यात फुंकर मारायची तेव्हा सिग्नलला थांबलेल्या बच्चे मंडळींच्या चेह-यावर एक तृप्ती दिसायची. ती तृप्ती तिच्या रस्त्याकडेला बसलेल्या मुलांच्या चेह-यावर कधीच दिसायची नाही.
त्यांचा चेहरा तेव्हांच तृप्त व्हायचा,जेव्हा ती चुलीत फुंकर मारायची.