Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Writer’s Block-Bhagyashri Bidkar

$
0
0

हा दृष्टीकोन महत्वाचा आहे...

Writer’s Block – भाग्यश्री बीडकर

आभाळ गच्च भरून यावं आणि कोणत्याही क्षणी बरसू लागावं अशी तिची अवस्था होती आत्ता.तिने कपाटं उघडली सरसर कागद काढले..पण काय हे प्रत्येक कागदावर काही ना काही लिहिलेलं...फक्त लिहिलेलं?!!! अहं प्रत्येक शब्दात आठवणी, काही हरवलेल्या, काही गवसलेल्या..काही अव्यक्त भावना..काही कंगोरे मनाच्या खोल तळाशी जपलेले... काही निद्रिस्त ज्वालामुखी..तर काही आनंदी,रंगेबेरंगी फुलपाखरंदेखील.....तिने शोधलेेच मग कागद..लेखणी घेतली हाती... लेखणी हातात घेताच ओळखीची खूण पटली...ओळखीचं हसू फुललं..शब्दांशी नजरानजर झाली..सूर जुळले..मनात आनंदाची लहर उसळली...झरझर झरझर ती लिहिती झाली...कितीतरी सांगायचं बाकी होतं.. खूप काही व्यक्त होणं बाकी होतं.. इतके दिवस ती फक्त श्वास घेत होती..जगत नवहती... किती लिहू नि किती नको असं झालं तिला...मागच्या काही दिवसातले संवाद आठवले तिला

क्ष व्यक्ती-"काय गं आजकाल लिहीत नाहीयेस का?"

"हम्म...काय करू समजत नाहीये..ब्रेक घेऊन झाला...कॉफीवर कॉफी झाल्या..पावसात भिजून झालं...वेगवेगळं वाचून पाहिलं...नुसतंच शांत बसूनही पाहिलं...पण काही केल्या माझ्याकडून लिहिलं जात नाहीये" इति ती

समोरून एक निर्विकार निश्वास

"ओह्ह...होतं असं कधीकधी तुला ना तो रायटर्स ब्लॉक आलाय बाकी काही नाही"

अमका- "काही दिवस लेखन थांबव. घुसमटलीस की आपोआप व्यक्त होशील "

ढमका- "शांत रहा, मेडिटेशन कर. बघ हा ब्लॉक जाईल"

अबक व्यक्ती- "तू नं पाणचट सिरियल्स बघ...अलाणी फलाणी सिरिज उडवून टाक...नाहीतर चल एकेक पेग रिचवू"

अजून किती किती नि काय काय....सल्ल्यांचा ओघ थांबता थांबेना..रायटर्स ब्लॉक का काय तो कमी व्हायचं मात्र नाव नाही...उलट हिची अस्वस्थता मात्र वाढत होती...पण कुठून कसं जाणे एक क्षण आला..अक्षरशः तिच्या अंगावर आला...आता तिला समजलं बरसल्याशिवाय आपली सुटका नाही ..इतके दिवस मनात साचलेलं सगळ बाहेर आलं..अडवूच शकली नाही मग ती स्वतःला..ती फक्त बरसत गेली आणि समाधानी सुखात न्हाहून निघाली..आता कागद आणि लेखणी यांची साथ कधीच सोडायची नाही याची तिने खूणगाठ बांधली.

न लिहिलेल्या कागदांची तिनं विमानं बनवली..अगदी आखीवरेखीव नि पद्धतशीर...आणि स्वतःशीच तिरकस हसत म्हंटली

"हॅ....रायटर्स ब्लॉक म्हणे"

आणि मग तिनं ती विमानं एका फुंकरेसरशी उडवून दिली


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Latest Images

Trending Articles



Latest Images