Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

लघुतम -Bhagyshri Valsange

$
0
0

पुन्हा तिन लघुतम कथा - भाग्यश्री वळसंगे

दृष्टी -

आज सकाळी दोघांनी होटेलमध्ये एकत्रच नाष्टा ऊरकला. तो हात धुवायला वळला काहींच न बोलता. तो हात धूऊन परत आला, डोळ्यांवर चष्मा चढवला.. आणि एकाएक ऊद्गारला

'व्हिजन क्लिअर केलंस तू माझं'.

तो हात धूवून येऊपर्य्नत तिने चष्मा साफ करून ठेवला होता.

ढग आणि मन -

भर दिवसा अचानक ढग दाटून आले की कसा अंधार पडतो

अगदी तसंच आज झालं - बाहेरही आणि मनातही !

बाहेर - एकाएकी वा-याने फेर धरला, ढग लगबगीने दाटले आणि काहींच क्षणात मोठे मोठे थेंब मनात - काहीतरी बोचलं, आठवणी आणि विचार दोन्हींची एकत्र गर्दी झाली, समजून चुकलं कि 'ही वेळ' माझ्याकडून 'माझंच' काहीतरी मागत आहे. पाचोळ्याने फेर धरला होता तशीच गरगरून भोवळ आली आणि सुन्न अवस्थेत मोठाले थेंब ओघळू लागले

ढगांच्या आणि मनाच्या अवस्थेत एकच फरक होता –

ढगांतून ओघळलेलं पाणी परत वाफ होऊन त्याच्याचकडे जाणार होतं. जे ढगांचं आहे ते त्यांना मिळणारच आहे.

मनाचं तसं नव्हतं - आणि मग पूढे सगळा अंधारच!!!

संवाद -

'आज संध्याकाळी भेटशिल? मागच्या कांही दिवसात खूप कांही बोलायचं राहून गेलंय'.

मग संध्याकाळी चहाचे प्याले हातात घेऊन दोघे नुसतेच एकमेकांनकडे पाहत राहीले. आणि आप-आपल्या घरी परतले ते खूप-खूप बोलून मोकळं झाल्याची जाणीव घेऊन!


Viewing all articles
Browse latest Browse all 1118


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>