प्रेम काय असतं? पुन्हा शब्दांची लय पहा...व्वा!
प्रेम - अनामिका
तुझ्या इच्छे खातर निर्वसनी, निरभ्र होत जातं माझं मन आणि उरतो लखलख पारा प्रेमाचा ...घे ना ओंजळीत ...हे एव्हढंच तर मागतोस तू, हो ना ? नग्न त्वचेवर उमलतात काटे, लाह्या फुटाव्यात तसे तडतड,आणि तू तुझ्या संपूर्ण स्नेहार्द्रतेने ओथंबलेला, स्निग्धसा बरसू लागतोस एकमेकांवर उधळलेले क्षण टपटपतात फुलांसारखे,गंध कल्लोळ माजतो गात्री आणि रिमझिमतात सरी, अंतरबाह्य लाटांवर उठतात लाटा,असोशिनी सावरून धरतोस तू ,एक अनिवारशी थरथर मिटून जातात सीमासाऱ्या ,उरतो असीम आनंद डोळे मिटून मी झेलत राहते फक्त सुख पेशींपेशीत झिरपणारं, आत्मरत, आत्मनत, आत्ममग्न आत्मस्पर्शी ---उन्मन
प्रेम दुसरं काय असतं ?