काल्पिताई दुःखाला पोखरून स्वतःचा एक मार्ग शोधते आहे.
वास्तव – कल्पि श्याम जोशी
वास्तव हेच आहे..म्रुत्यु विसरायला लावणारी भुक ताटभर जेवायला लावते भलेही आवंढे गिळत का होईना ...जेवावं लागतच
मनाच्या यातना लपवाव्या लागतात आरशात भकास चेहरा बघायचं भान येतच
घरातला अंधार असह्य झाला की अंगणातल्या बागेची हाक कानात ऐकायला येतेच हळुहळु तु लावलेले गुलाबाचे ताटवे..प्रफुल्लित फुलुन येतात सांगतात तुझ्याच आठवणी आठवणिंचा खच पडतो प्राजक्ताच्या पायथ्याशी....... सकाळी अशा कितीतरी निघून जातात रात्री अशा कितीतरी रडुन घेतात पण एखादी जखम काळानुसार
ठणकत राहते आतल्याआत.........बोचत राहते मनात एक प्रश्न येतो नेमका तूच का दिसलास त्याला
ताटातूट सहन नाही होत पण सहन करायची
...........का का? ??