आज भाग्यश्री वळसंगेच्या लघुतम गोष्टी ...भाग्यश्री पुण्याच्या लेखन कार्यशाळेत होती...खूप शांत...नंतर गायब होती...आणि आज उगवली ती एकदम ९ लघुतम कथा..आणि सर्व उत्तम...किती आनंद होतो! आज ३ देत आहे...
कळ
तिने विचारलं, "तू मागच्या वेळेला कधी कासाविस झाला होतास रे..??"
तो नेहमीप्रमाणेच अल्लड, खूप वेळ विचार करूनही दुःख काही आठवेना. मग अचानक ती कळ आठवली जेव्हा तिने दिड दिवस अबोला धरला होता..
विसंगती –
आत्तापर्यंत वेळ 'तिची' होती तर दोन खोल्यांमध्येच तिचं सुखी जग कसं आपसूक मावलं होतं पण तिच वेळ आता 'वैरी' झालीय आणि त्याच दोन खोल्यांच्या घरात ती कित्ती सैरभैर झालीय... विसंगतीचं वागणं इतकं विसंगत असावं..??
सुरुकुत्या –
त्या मऊशार चादरीवर बराच वेळ तशाच राहीलेल्या सुरकुत्यांकडे तिची नजर गेली आणि एकाएकी जाणवलं, या सुखद सुरकुत्या तर खूप अल्पायुषी आहेत..