सुंदर...तरल कथा...
पावसाळा – सोनाली गायकवाड
त्याच्या फोटोसमोर ठेवलेल्या खोबरावडीला मुंग्या झाल्या....फोटोवरच्या शिळ्या हाराबरोबर तिने त्यांची रांग काढून टाकली...
मुंग्यानी पावसाळ्यापूर्वी केलेली अन्नाची बेगमी संपली असणार. मग त्यांना 'बाहेर' पडावेच लागले. पावसाळा जरा जास्तच विसावला नाही यावेळी! ती स्वतःशीच पुटपुटली.
खिड़कीजवळच्या बेडवरची पावसाने भिजली, म्हणून नुकतीच बदललेली बेडशीट पुन्हा भिजली....पाऊस थांबला तरीसुद्धा!
खरंच, या वेळी पावसाळा जास्तच विसावला. डोळ्यांना दिसणाराही आणि डोळ्यांत असणाराही!