एक न केलेला प्रवास आहे आणि तरीही खूप मोठा प्रवास आहे हा....
स्वप्न – अभिषेक पाटील
खोल समुद्रात अचानक पडलो..
हात पाय हलवले तरीही तळाला जाऊन टेकलो..
प्रकाशही खुप कमी होता
भयानकतेचा मला घेराव होता..
पण मी श्वास घेत होतो..
सुंदर,भयानक,घाणेरडे जलचर त्यांचे स्पर्श अनुभवत होतो..
पाण्याखाली सैरावैरा पळत होतो..
कुठे उंच उंच दगडांच्या भिंतीला धडकत होतो
तर कुठे खोल खोल दऱ्यांमध्ये कोसळत होतो
पण मी श्वास घेत होतो..
त्या खोल पाण्यात कुणाचातरी पाय हाताला लागला..आणि वाटले "अरे वा आपण तर किनाऱ्यावर आलो"...
पण जोरदार लाटेने पुन्हा खोल गेलो..
तिथल्या अंधाऱ्या दरीत सुन्न होवून पडलो..
पण मी श्वास घेत होतो..
जाग आली आणि सुखरुप होतो..