ह्या खुणा सर्वभर पसरतात आणि आयुष्य कठीण करतात.
खुणा - रश्मी पदवाड मदनकर
सख्या
तू येतोस ... तुझे सळसळणारे चैतन्य शिंपत फिरतोस उत्साहाच्या चंदेरी सुमनांची पखरण करतोस मनमोकळे हसतो ... जीव गुंतवत रमतो अन मन भरण्या आत निघून जातो जातांना तुझ्या येण्याच्या सगळ्या खुणा वेचून नेतोस
तुझ्या असण्याच्या खुणा मात्र तिथेच सांडून जातोस तुझ्या असण्यात माझ्या गुंतण्याच्या खुणा लपत नाहीत आणि ... तू येऊन गेल्याचा अंदाजही लोकांचा मग चुकत नाही.