आपल्या समाजाला ह्या दुट्टपी वागण्याची कीड लागली आहे...
"झाशीची राणी" – मेघा निकम
साऊच्या दोन दिवसांच्या अभ्यास सहलीसाठी आप्पांची परवानगी घ्यायला माई माजघरात गेली. स्वयंपाक खोलीच्या दारातून साऊ पाहत होती.
"काय करायची पोरीच्या जातीला अभ्यास सहल? स्पष्ट 'नाही' म्हणून सांगा"
‘आप्पांचा साफ नकार ऐकून साऊला कालची संध्याकाळ आठवली.
वेशभूषा स्पर्धेत 'झाशीची राणी' बनलेल्या साऊचे आप्पांनी मित्रांच्या घोळक्यात भरभरून कौतुक केले होते.