सुमित्रा माझी आवडती लेखिका....क्या बात!
आठव – सुमित्रा
‘तुला आठवणबिठवण येते की नाही?’
झ्या या भाबड्या आणि थोडा आत्मप्रौढीचा वास येणाऱ्या प्रश्नाला खरं तर खरं उत्तर द्यावं असं वाटलं नाही आणि म्हणूनच मग तो प्रश्न हसून सोडून दिला, तरी तू चिकाटीनं विचारत राहिलास, तेव्हा म्हटलं,
‘आठवणींवर राज्य कुणाचं, असं कुणी म्हटलं तर ते फक्त तुझं आहे.’
हे उघड म्हटलं.. माझ्या चेहऱ्यावर अगदी मंद स्मित होतं.. ते हसू ओठांवर ठेवता ठेवता आणि मग मनातल्या मनात मी म्हटलं,
‘खेळात राज्य आलं, की आपण दुसऱ्याला आउट करायला धडपडतो.. तसं आठवणींवर राज्य आल्यावर त्या आठवणींनी तुला आउट केलंय.’