Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

मर्द-Umesh Kambale

$
0
0

हे असं मुंबईत घडतं.....पौरुष अनपेक्षित ठिकाणी सापडतं.....

मर्द-उमेश कांबळे

“यात्रीयों कृपया ध्यान दें...ये मुंबईका छत्रपती शिवाजी टर्मिंनल है ....”

जाग आली तिला..रात्रीचे दिड वाजलेत....भोपाळ ते मुंबई ...निव्वळ त्याच्या शब्दावर..तिनं हे साहस केल ...पण आता घाबरलेय ती...खुप कॉल करतेय पण. त्याचा मोबाईल लागत नाही...दोन तीन वेळा रिंग ही झाली..उचलला नाही त्यानं....आता कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर ....

काय करु?

मुंबई देखी नही कभी....सपनौकी नगरी...बोलते इईसको..बहोत सपने दिखाये..कभी आता था वो..गांवमे ...अच्छा था वो...चुडींया..लाता था....बिंदीया भरपुर नये नये डिझाईन वाले...उसने बोला था....कभी आव मुंबई...जन्नत है यहां...शादी करुंगा रानी जैसी रखुंगा...तेरेकु...मुझे पैचानती नही अभी तु ....मै तो निकल पडी,..उसने बोला था आ..कभिभी..

पर वो कहां है ???

खांद्यावर ब्यागा मारुन मी निघाले....काही कळत नाही रस्ते...लाईट... आवाज ....माणसं ...भरपुर ...चिकटणारी.. ढकलणारी...लांबुन आवाज येतोय...अंडा पाव..बिर्याणी...बुर्जी पाव...बाहेर पडले स्टेशनच्या...आ जाव क्या चाहियै?....डोक्यात गोंधळ माजला..

फिरुन दमले किती वेळ झाला...काहितरी खाल्लय चव नाही कळली....पोट भरल पण..मग रात्र भरुन आली..भिती दाटुन आली....माणसच सगळीकडे...चेहरे बघत बसले...हिणकस भेसुर वाटले ते मला...मी अशीच बसलेली..ढोपरात डोक टाकुन...फुटपाथाच्या साईडला...समोर अंडाबुर्जिची गाडी ...

कोणतरी सोबत बसला बाजुला...स्पर्श जाणवतोय...स्पर्श पुरुषी की स्त्री कळत नाही.....हा गांडुपणा आहे डोक्यात विचार आला ......स्पर्श याला भावना आहेत??? सोबत बसली ती....कि तो...???? मान वळवुन बघीतलं....छक्का .....बायकी वेशातला पुरुष तो ....

क्या हुवा रे ??,

घाबरले मी ...विस्कटलेले केस ..डोळ्यात ओघळलेल काजळ. दाढी केलेल्याची निळसर हिरवी झाक गालावर.. ओठांवर...ओठाबाहेर पडलेली डार्क रेड लिपस्टिक...त्यावर हात फिरवत सगळ्या तोंडावर पसरलेय ती....जरीची फालतु साडी.....दारुचा भपकारा ...

हिजडा.....

किधरसे आयी है ???

भोपाल ...

क्युं? लव है ...??? किसीने बुलाया मुंबयमै ..?,,

हां ...

तेरा फोन उठा रै या नही ..???

नही ....

वापिस जा...नही तौ..रंडी बनके रहेगी मुंबईमे...वापिस जानेका रस्ता नही...सडकै मरैगी यंही.....ये प्यार व्यार..दिखावा है..फसतीं हो तुम जैसी लौंडीआ ...प्यार करती हो मर्दपर...वो पिक्चर वाले हिरो जैसा दिखाता है..उसपर..उसके डोलेशोलेपर..स्टाईल पर....मरती हो तुम...असल मे वो ही नामर्द है..पर समझेगा नै कभी तुमकौ ...क काम कर..ये रख हजार तु कभी आयी नै...मुंबईमे..दो घंटे बाद गाडी है तेरे गांव की..वापीस जा....सबकुछ भुल जा.....

पर ...आपका नाम ???

मर्द...बोलना अच्छा लगेगा .. बोलना ऐक मर्द मिला था !!

और वो चला गया लडखलाता .......

मी बघतच बसले ....

साडी नेसुन ..टाळ्या वाजवत...ये राजौ..करत....सगळ्या जगान नाकारलेला...पण स्वताःच्या जगलोकीचा नामर्दतेचा सोहळा...रोज साकारणारा खरच ऐक मर्द चालला होता ....

तोच खरा मर्द ...


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Latest Images

Trending Articles



Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>