का सुडाची भावना निर्माण होते मनात?
सूड – मारिया जोसेफिन
ताईच्या बाळंतपणात आमची एकच खोली
खोली = किचन+हॉल+बेडरूम+सगळं
खोलीच्यामागे मागच्या घराच्या गटारी पर्यन्त तयार झालेल्या बोळकांड्यात आमची पडद्याची मोरी वरून उघडी. कोणी नाही ना बघून अंघोळ करणार. तिथच प्यायचं पाणी. आजी गांडीखाली 8 मोठ्या खोल्या दाबून बसलेली. मेल्यानन्तर आम्हाला मिळणार होता तिचा हिस्सा.
आईने अजिजिनी विचारलं आमच्या खोलीजवळची खोली देता का ताईला.
आजी म्हणते रांडा तर रस्त्यावर जनतात. त्यांना कुठं इतक्या सोयी. जगतात ती पोर. तशी होईल तुझ्यापण मुलीच बाळंतपण.
आईने तरी बापाला सांगितलं.
बापाने आजीला नुसतं विचारलं "का ग नाही म्हणतेस??"
आजी म्हणते "स्वच्छता ठेवणार नाही मग माझी चिडचिड होईल र...त्यापेक्षा नकोच"
बाप म्हणाला "हो"
दोघांना काठीने तुडवयाच होत!