श्रद्धाच्या कथेत शेवटच्या वाक्यात नेहमीच तुफान असतं...
माळी – श्रद्धा सचिन राजेभोसले
हरणीच्या यौवनाची मोहक कळी आत्ताशी कुठे उमलली होती...तिची पाकळीन् पाकळी स्वाभाविक फुलायची तर तिला या वेळी दवबिंदूचा अभिषेक हवा होता....प्रभात वायुची नाजूक फुंकर हवी होती....आणि शिवाय स्निग्ध दृष्टीने काळजी घेणारा माळीही हवा होता .
...पण ......
शिवाचा हात बाग फुलवणा-या माळ्याचा नव्हता ...तो होता एका दांडग्या आचा-याचा.... पाण्यातली पालेभाजी मुठीने पिळून फोडणीला टाकायची, एवढी एकच कला त्याने संपादन केली होती ....
मर्दपणातही जे एक मार्दव असते, ते त्याने कुठे विकुन खाल्ले होते कोण जाणे!!!