Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

कपाळ करंटे-Aarti Joshi

$
0
0

एक निर्दयी सत्य....त्याला भिडावच लागत..नियती म्हणतात तिला..

कपाळ करंटे – आरती जोशी

बारा वर्ष होत आली त्यांच्या लग्नाला....दोघंही सॉफ्टवेअर इंजिनीअर....पाच आकडी पगार.... चकचकीत फ्लॅट....फुल फिर्निशड...ग्रँड न्यू कार....दिमतीला नोकर चाकर......सगळं सुख पायाशी लोळण घेत होत....

फक्त एकच कमी होती...दुदुदुडू चालण्याच्या पावलांची....

प्रत्येक वेळेस बाळाची चाहूल लागायची....प्रांजल जीवापाड जपायची त्याला आणि स्वतःलाही....पण तरीही फार तर दहा दिवस....बास.... अस आता किमान सहा वेळा तरी झालं होतं....या वेळेसही तेच झालं सातव्यांदा....

'कपाळकरंटे.....दुसरा शब्दाच नाही.....'तो' देतो.....ओंजळी भरभरून....पण आपली ओंजळच फाटकी....'

प्रांजलने जवळजवळ ओरडूनच कुमारला बोलावले....

'कुमार ....ओह....नो....आपलं सगळं प्लॅंनिंग फसल....टेस्ट पॉझिटिव्ह आली....'

काळजी प्रिकोशन घेतली होती....माझं सगळं इयरली बजेटच काय? शीट यार.....'

तेवढ्यात दारावरची बेल वाजली....रखमा होती....

'ताय.... कोंची भाजी करू बगा???.... तुम्हास्नी कोनत्या वक्ताले जायचं हाय ऑफिसमधी? तिची बडबड अखंड सुरूच होती....

तेवढ्यात प्रांजलला कोरड्या उलट्या सुरू झाल्या...चार मूलं असलेल्या रखमाला काय ते चटकन उमजल...ती खुश होऊन म्हणाली मी कायबी करायचं न्हाय.. पोटोशी हाय नव तुमी आता...'

प्रांजलला एकदम ओशाळाल्यासारखं झालं..

'तसं काही नाही रखमा तू तुझं काम कर बरं'....

तरीही रखमाच्या तोंडाचा पट्टा चालूच होता...

'अव ताय आय होन म्हनजी बायांच्या मागच्या जन्माची पुण्याई बगा.....ते बारक पोर जेवा 'आय' म्हनत ना...तेवा वेगलाच आनन्द मिळतो बगा...आपल्या लेकरासनी माया देन यापरीस दुसर सुकं नाई..... माझ्या मालकान माझं खूप कौतीक केलं......पोटोशी व्हती तेवा....दिनभर काम करून परत रातच्याले काम करायचा त्यो अन सकाळच्या टाइमला गरम भजी आनायचा....माझ्यासाटी....एक भाकर असलं तर त्यो म्हनायचा....माझं पोट भरलं हाय रखमे तू जेव गुमान....'

रखमा खूप वेळ एकटीच बोलत होती....

ती गेल्यानंतर प्रांजल कुमारला म्हणाली....

'बघीतलस कुमार तू कसली असतात ही लोक.... ह्याची इथे खाण्याची मारामार पण त्याना चार पोर मात्र जन्माला घालता येतात....कस करतात कोण जाणे....इथे आपल्याला एकाचीच चाहूल लागली तर तारांबळ उडालीये.....'

कुमार :- "प्राजु, i think we should abort this time....will plan later for baby...."

प्रांजल :- "पणt कुमार डायरेक्ट abort म्हणजे....मला थोडा वेळ दे विचार करायला....

कुमार :- " ok... take your own time..."

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या बरोबर प्रांजल म्हणाली...

.मला वाटत तू बरोबर आहेस.... ज्या बाळाच्या कल्पनेनेच आपल्याला "ओह नो" अस होतंय त्याला जन्म देण्यात काय अर्थ आहे...नंतर पश्चाताप करण्यापेक्षा बेटर की आताच नीट प्ल्यान करूयात....मी आजच डॉक्टरची अपॉइंटमेंट घेते.....'

सगळं कसं त्या दोघांच्या मनासारखं झालं....डॉक्टरने प्रांजलला एक औषध दिल.... "त्या औषधाने प्रोसेस सुरू होईल आणि नंतर लगेच या ठिकाणी जाऊन सोनोग्राफी करून उद्या परत या" अस सांगितलं...

दोघंही लगेच सोनोग्राफीला गेले....तिथल्या डॉक्टरांनी सोनोग्राफी सुरू केली....आधी छोटासा बाळाचा ठिपका त्यांना दाखवला....मग त्याचे ठोकेats ऐकवले....'धक-धक---धक-धक----धक-धक'....कुमार शांतपणे सगळं बघत होता....पण प्रांजलचा मात्र कुठेतरी ठोका चुकला....

तसेच दोघ घरी आले....कुमार खूप चिडला होता... ."आपण त्याना सांगायला हवं होतं की we are going to abort...congrats etc...काय...."

प्रांजलच्या डोळ्यात टचकन पाणी आलं....तिला रखमाच प्रत्येक वाक्य आठवत होत....आपल्याला कोणीतरी तलवारीने चिरतय अस वाटत होत तिला....ती फक्त चिरली जात होती उभी.... आडवी... तिरपी....

रात्रभर ती टक्क जागी होती...आपल्याला जर

'आपल्याच पोटात जाऊन त्या पिल्लाशी बोलत आलं तर....एकदा निदान त्याला जवळ घेऊन सॉरी तरी म्हटलं असत....'

"सॉरी".... तिच तिलाच हसू आलं....एका जीवाला मारतोय आपण...आणि त्यालाच म्हणायच की सॉरी रे बाबा मी मारते हा आता तुला.... ‘

प्रांजलने ठरवलं काहीही झालं तरी या जीवाला जन्म द्यायचाच.....तिच तिलाच मोकळं वाटलं.... इतक्यात....तिला काहीतरी जाणवलं ...चिकट-चिकट.....'रक्त.... रक्त....सगळं फक्त रक्तच'... वेगवेगळ्या अवयवांचा आकार घेऊन ते बाहेर पडत होत....ती गोठलेल्या डोळ्यांनी ते बघत होती....'हा कदाचित त्याचा पाय असेल'......डोळ्यांसमोर अंधारी येऊन पडली शेवटी ती...

त्या दिवसानंतर.....आजचा दिवस आहे....ती वाटच बघते आहे की रक्ताच्या थारोळ्यात कधीतरी तिला ति 'जिवंत' मूल दिसेल...

पण आता बहुधा 'तेच' तिला नाकारत असाव...आई म्हणून....


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>