Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

जंगल-Megha Pardikar

$
0
0

किती संवेदनशील मनाने लिहिली आहे ही कथा...चुकवू नका...

जंगल - मेघा संगम पारडीकर

नदी काठावर च्या मोहावर,पहाटे असंख्य पक्षांची किलबिल सुरु होती, पण जाणवत होतं, काहीतरी बिनसलय! भाकर तुकडा खावून, रघू जरा लिंबाच्या सावलीत आडवा झाला, तो डोळा कधी लागला ते त्याचं त्यालाही कळलं नाही. जागा झाल्यावर स्वतः वरच चरफडत, बोलू लागला,

"या उन्हानं जिवाचि तगमग तगमग नुस्ती,कामं उरकता उरकत न्हाई तं! आजचं काम पुरं निपटूनच घरला जायाचं!"

असं म्हणून पुन्हा, रघू कामाला लागला.

काम संपवून घराकडे निघताना त्याच्या लक्षात आलं, आज जरा जास्तच उशीर झालाय. तिन्ही सांज झाली. वाळक्या फांदीवर बसून पिंगळा किचकिचत होता. रघू,भराभरा पावलं उचलू लागला. दोन-तीन शेतं ओलांडून उतरणीवर येईस्तोवर चांगलंच अंधारलं होतं ,नाही म्हणायला आकाशात चंद्राची साथ होती.

आज वैशाख पौर्णिमा !

खूप दूरवर चं नाही पण पायवाट दिसण्या पुरता उजेड होता. नदीपात्राच्या उतरणीवरुन उतरताना त्याच्या मनात विचार आला,

“अजून बरीच चाल बाकी हाये, एकादं जनावर आडवं आलं तं काई धडगत नाई"

विचारानच घामाघूम झालेल्या रघूनं कोरड्या नदीपात्राच्या जिवंत झरा असलेल्या डबक्यातल्या पाण्याने तोंड धुतलं. नदीकाठा वरच्या महादेवाच्या जूनाट मंदिरात जाऊन त्यानं डोकं टेकवलं. पुढे एकही पाऊल टाकण्याची हिंमत त्याच्यात आता उरली नव्हती. सभोवताल नजर फिरवित तो उभा होता. नदीकाठा वरच्या अर्जूनवृक्षाच्या सावल्या गूढता वाढवत होत्या. खाली पसरलेल्या पाचोळ्यावर वाळकी काटकी पडली तरी आवाजानं काळजाचा ठोका चुकत होता. रघूनं ठरवलं आजची रात्र मंदिरातच काढायची. हातातली कुर्हाड डोक्याशी ठेवून तो तिथेच सावधपणे झोपला.

काठावरचा मोह,बघून हसला,स्वतः शीच बोलला,

"ह्या माणसांना कुणी सांगावं, आमच्या जंगलात उगाचच कोणी कोणाच्या वाटेला जाणार नाही. अपवादाने घडणार्या घटनेला नियम मानणार्या माणसाला काय सांगावं!”

आकाशात कुठे कुठे छोटे छोटे ढग दिसत होते. चंद्राचा त्यांच्याशी जणू लपंडाव चालला होता. मधूनच गार हवेची झुळूक वातावरणातील ताण सैल करत होती. रातव्याचे चूक् चूक् चुकुर्र्रररररर आवाजात साद -प्रतिसाद वेगवेगळ्या जागेवरून येत होते. मधूनच दोन -चार काजवे चमकून जात होते. हळू हळू अर्धी रात्र उलटून गेली. रघू सावधच होता. त्याची भितीही बरीच कमी झाली होती. तहान लागली म्हणून तो उठला. नदीपात्रात उतरुन ओंजळीने पाणी पिऊन माघारी फिरला.

इतक्यात....

पाण्याकडे उतरणार्या नेहमीच्या वाटेवरुन अस्वल उतरु लागले,पाण्याजवळ जाताना त्याच्या पायाखाली येणाऱ्या पाचोळ्याचा आवाज जवळजवळ येवू लागला.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>