Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

पद्मालय–Asawari Deshpande

$
0
0

पद्मालयचा हा शेवटापूर्वीचा भाग...गेले ११ आठवढे ह्या कथेने खिळवून ठेवले आहे...शाब्बास आसावरी.

पद्मालय–आसावरी देशपांडे

भाग ११

तीन पैकी एका कमळा वर मला शारदाचा चेहरा दिसत होता. ती माझ्याकडे अतीव संतापाने पाहात होती.काही केल्या तिचे डोळे माझा पिच्छा सोडत नव्हते.. मी तिथून अक्षरशः पळ काढला पण तरी देखील तिचे डोळे माझ्या मागावर असल्याचा भास झाला...क्षणभर वाटले तुळशी वृन्दावनाचा आसरा घ्यावा,पण तिथेदेखिल कमळाचा उंबरठा ओलांडणार तेवढ्यात तिथेच जोरात आपटले, कपाळा वरुन रक्ताची धार वाहत होती, थोडक्यात डोळा बचावला... कपाळावरचे रक्त डोळ्यावरुन खाली नाका तोंडाकड़े येत होते, पण माझे डोळे उंबरठ्या वर खीळुन होते, लाकड़ी उंबरठ्याला तडा गेला होता आणि लाकड़ी त्याच्या खाली काहीतरी चमकणारी वस्तू दिसत होती....

मनवाला मोह आवरला नाही तिने विचित्र कुतुहलापोटी उंबरठ्याची उरली सुरली चौकट खाड़कन स्वतःच्या हातानेच ओढून काढली. पद्मालयात आतापर्यन्त झालेल्या संरक्षणाचा एकमेव स्त्रोत अखेरीस गळून पडला...ती चमकणारी वस्तू म्हणजे दूसरे तिसरे काही नसून मिहीर आणि मनवाच्या' प्रेमाची साक्ष' होती..ही अंगठी म्हणजे मिहिरचा 'प्राण' होती गेल्या दोन वर्षात मिहीरने कधीच या अंगठी ला स्वतःपासून दूर केले नव्हते, ही अंगठी या ठिकाणी म्हणजे मिहीर सोबत काहीतरी अघटित घडल्याचा संदर्भ तर नसेल नं?

नैना

मिहीर तुझी मनवा इतकी स्वार्थी असेल असे वाटले नव्हते, बघ तुझा गर्व तुझ्या तसबिरीला लटकलेल्या कोमेजलेल्या फुलांवर धूळ खात पडला आहे...तुझ्या मनवाला तुझ्यासोबत येण्यासाठी कितीतरी संधी मी दिल्या, पण तुझी मनवा तुझ्यापेक्षा स्वतःवर प्रेम करणारी निघाली..प्रत्येक वेळेस नविन मोहात स्वतःला अडकवत गेली..तू तिच्यावर इतके प्रेम केलेस तिने तुला काय दिले... फ़क्त प्रतारणा...

तूला दिलेल्या वचनाप्रमाणे मी तिला तुझ्यासोबत मोक्षाचीपण संधी दिली, वेडी ठरली...एक किंकाळी ऐकली आणि सुटली धावत...मिहीर ती कधी तुझी नव्हतीच रे...ती फ़क्त स्वतःच्या दुःखावर प्रेम करते..ती तिच्या दुःखाला कुरुवाळणार, मोठ्ठ करणार,सहानुभूतिचे खवले अंगावर चिकटवणार आणि स्वतःचा उदोउदो करत मरणाऱ्...

पण आता ती माझ्या 'पद्मालयात' आहे त्यामुळे आता मला हवं तेच होणार.. तू तुझ्या प्रेमाला 'पदमालय' बहाल केलेस, आता हेच पदमालय तुमचे प्रेम छिन्नविछिन्न होताना पाहील...कारण प्रेम मोठ्ठ फ़क्त नैना कबीरचं...

प्रेम करावं नैना सारखं.. जन्मोजन्मी वाट पाहणारं.. धारदार संवेदना जागवणारं अनेकांचे अस्तित्व गोठवणारं स्वतःच्या अतृप्त इच्छा पुरवणारं 'अपूर्णतेचा शाप 'घेऊन पूर्णत्वाची ओढ़ असणारं..

क्रमशः


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>