Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

पद्मालय-Aasawari Deshpande

$
0
0

उत्कंठता वाढते आहे...थरार वाढतो आहे.

पद्मालय – आसवारी देशपांडे

भाग ८

मिहीरची गाडी नजरेपासून दूर जाऊन फ़क्त तास झाला होता पण मला अगदी यूगासारखा भासत होता, मिहीरची आणि माझी पहिली वहिली भेट, आमचं एकमेकांमधे गुंतणं, मिहीरला माझ्यासाठी त्याच्या घरच्यांशी करावा लागलेला संघर्ष..आणि नविन नात्याची सुरुवात..

वास्तविक आमच्या लग्नाला मिहिरच्या घरच्यानी इतका विरोध का करावा याचे फार आश्चर्य वाटत होते...लग्न झाल्यावर काही दिवसानीच याचा उलगड़ा झाला खरा ...मिहीरच्या बहिणीने सांगितले की आमच्या पत्रिका जुळत नाहीत, ताटातूट होणार वगरे ..अजूनही आठवतो तो दिवस..त्यावेळेस मिहीर जोरजोरात हसत सुटला पत्रिकांचे दोन तुकडे केले...पत्रिका ज्योतिष्य कसे थोतांड आहे यावर तासभर माझी समजूत घालत बसला पण तो बाहेर जाताच मी पत्रिकांचे तुकडे गोळा करून ती सांधण्याचा प्रयत्न केला आणि जपून माझ्याजवळ ठेवली कारण मनात एक अनामिक भीती होती मिहीरपासून दुरावण्याची...

आजच या गोष्टी ची मला का आठवण व्हावी.. कदाचित माझी आणि मिहीरची ताटातूट होण्याचे क्षण जवळ आलेत की काय?

हो.. कोणीतरी माझ्याजवळ यायचा प्रयत्न करतोय..मला त्याची चाहूल जाणवतेय..पण मग मी त्याचा चेहरा का नाही पाहू शकत?.. माझे डोळे त्या प्रकाशाच्या लोळाशी सामना करता करता थकलेत बहुतेक... आता मी फ़क्त डोळे मिटून ओळख पटवण्याचा प्रयत्न करतेय... हो कोणीतरी आहे माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा, माझ्या पावलाला स्पर्श होतोय त्याच्या कातड्याचा...जणू काही माझ्यासाठी त्याने त्याच्या कातड्यांच्या पायघडया अंथरल्यात...त्याचे अवयव त्याच्याशी प्रतारणा करताना जाणवताहेत...तो हात पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय; पण प्रत्येक वेळेस त्याचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत...आता मला माझे प्रयत्न वाढवले पाहिजे माझी इतकी जवळची व्यक्ती तड़फड़तेय आणि मी डोळे मिटून बघत कसे राहू? पण त्याच्या हृदयाच्या ठोकयांची गती धीमी धीमी का होतेय? हळु...हळू... अजून हळू..... आता आवाज पूर्णपणे थांबलाय...

पुन्हा एकदा माझे डोळे उघडण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरतात..आता माझा हात धड़पडत पुढे सरसावतो त्याच्या हातावर येताच जाणवतो मला.... फ़क्त एक थंडगार स्पर्श...माझ्या संवेदना गोठवून टाकणारा...आता मी माझं अक्ख शरीर झोकून दिले त्याच्यावर संपूर्णपणे...या आशेवर की माझं रक्त देखील गोठेल....नक्कीच...कारण मी त्याच्या खूप जवळची आहे ...नाही.. तो आणि मी आम्ही एकच तर आहोत....

क्रमशः


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>