Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

मनात–विनया पिंपळे

$
0
0

डोळे ओलावले माझे...दोष देण किती सोप्प करून टाकल आहे आपण....विशेषतः एका स्त्रीच्या संदर्भात

मनात – विनया पिंपळे

"हे काय !! ... ठेव आता तो मोबाईल बाजूला आणि ऐक मी काय म्हणते ते"

"हं...ठेवला ...बोल आता."

"जरा ॲक्चुअल जगात जगायला शिका बाईसाहेब. हे असं दिवसरात्र व्हर्चुअल जगात फेसबुकवर वावरणं म्हणजे जगणं नव्हे."

"कळतंय मला.... "

"..पण वळत नाही. असंच ना?..."

"अंहं ... मी वळवून घेत नाही असं म्हण. ते जास्त योग्य आहे."

"ओहोहोsss तर बाईसाहेबांना वळवून घ्यायचं नाहीये. हम्म्म... आणि का वळवून घ्यायचं नाही हे सांगण्याची तसदी घ्याल का म्याडम तुम्ही."

"मला आवडतं इथे यायला...."

"बस !!.... इतकंच??"

"हे इतकंच वाटतं तुला?... हेच कारण खूप मोठं आहे..."

"असं का??... असेल असेल. आता का आवडतं ते ही सांगून टाक एकदाचं... म्हणजे या व्हर्चुअलपायी ॲक्चुअलमधे गैरहजर असण्याचं ते मोठ्ठं कारण ऐकूच दे मला. माझं तरी ज्ञान वाढेल जरा..."

"होय मला हे आवडतं कारण मला 'what's on your mind?' हा प्रश्न फक्त इथेच विचारला जातो....."

"आता हे काय नवीन ??.."

"नवीन काये त्यात??

मी आयुष्यात जरा म्हणून चुकले तर सगळ्यांनी आपापले सल्ले लटकवण्याची खुंटी म्हणून वापरलं मला. एक निर्णय चुकला तर नालायक ठरवून मोकळे झालेत सगळे.

ॲक्चुअल मधल्यांना मी एक सायलेंट लिसनर म्हणून हवी आहे हे कळलंय मला आता.... माझ्या माईंडशी कोणाचं देणंघेणंच नाही. किंबहुना मला माईंड नाही असंच वाटतं सगळ्यांना..."

"छे छे ... असं काहीही नाहीय... उलट सगळ्यांना काळजी वाटते तुझी... म्हणून तर मला इतक्या दुरून बोलवून घेतलंय तुझ्याशी बोलायला..."

"... आणि तू सुद्धा आल्याआल्या त्यांच्या सारखंच बोललीस.. 'ऐक मी काय बोलते ते' असं म्हणून ....."

"........"

"तू फक्त एकदा सरळ सरळ विचारायचं होतंस बयो...मला काय वाटतं ते....सगळं सांगितलं असतं...अगदी सगळं सगळं...तेवढ्यापुरती खरोखर जगले असते....ॲक्चुअल....अगदी तू म्हणतेस तस्सं..."

"......................."


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>