तरल भवानीक कथा बर्याचदां उदास करते...पण उम्याने चमत्कार केला आहे...त्याची ही कथा विलक्षण पोझीटीव्ह उर्जा निर्माण करते...सलाम तुला उमया.
सरप्राईज-उम्या कांबळे
आज प्रेमाचा दिवस वेलेन्टाइन डे ...
सकाळ पासून ती शांत बसून होती घरात... मोबाइलला स्विच ऑफ करून...ऑफिसला सकाळीच निरोप दिला..तब्बेत बरी नाही म्हणून..कामवाल्या बाईलापण सुट्टी दिली... पाळण्यातली गोड परी हसत होती मधूनच..तेवढंच लक्ष जायचं तिच्याकडे...
चार महिने झाले तिच्या बाबाला जाऊन...त्याचीच तर आठवण येत नसेल ... का स्वप्नात अजूनही खेळवतो तिला???
विचारांचं काहूर माजलं डोक्यात...
त्याला जाऊन चार महिने झाले...ती आणि तो दोघंही नोकरी करणारी..मस्त कुटुंब..नुकताच फ्लॅट घेतला ...एक कंपनीत ती सेक्रेटरी तर तो IT इंजनिअर..
त्याला सरप्राईस द्यायला...खूप आवडायचं...अचानक संध्याकाळी घरी आला की
चल...
अरे पण जेवण होत आलंय रे ...
तू आवर पटकन आज चाइनीज खायला जाऊ ...
दुपारचं ऑफीसाच्या पुढे गाडी लावून फोन करे..
ये हाफ डे टाक चल पिक्चरला जाऊ मस्त...बाहेरच जेऊ आणि चौपाटी हिंडू..
अरे नको रे खूप काम पडलंय...
आग लाव त्याला. मी पाचच मिनीट वाट बघेन नायतर एकटा जाईन...
अर्ध्या तासन खाली यावं तर तो मुद्दाम पाठमोरा उभा .
सॉरी अरे. उशीर झाला ना ..
आपल्याला पिक्चरला जायचंच नव्हतं ....
मग????
सर्कसला ..जायचंय ..
काय रे तू काय लहान आहेस का आता ???
हे बघ...जो पर्यंत आयुष्य आहे लहान बनून जगायचं.... मज्या करायची... हे क्षण परत येत नाहीत..आयुष्याला शिव्या घालत जगणं आवडत नाही ग मला..आणि तुलाही सांगतोय ... माझ्या मागे पिल्लूला पण असंच करायचं ..
ये कायपण बोलू नको अभद्र...आणि साहेब पिल्लू व्हायचंय अजून..चला....
दिवस असेच जात होते..आणि त्यांना मुलगी झाली.
कित्ती खुश होता तो..परी हे नाव पण त्यानेच ठेवलं. पोटात घेऊन झोपायचा तिला. ती झोपली की तिच्या पोटाला हळूच गुदगुल्या करून लाडात बोबडं बोलायचं ...
हशू येत आमच्या पिल्लू ला .. काय रे!!!!!
आणि असाच एक दिवस तो सरप्राईज देऊन तो निघून गेला..कायमचा. एका अपघातात.. त्याची चुकीची नव्हती ...
तो असताना त्याने सेलेब्रेट केलेले दिवस त्याचा हसरा चेहरा त्याचा उत्साह...डोळ्यासमोर तरंगून गेला..ती आता कुठलाही दिवस साजरा करत नाही...तिचा वेलेन्टाइन निघून गेला होता ...
आणि परी परत हसली ..
मनाच्या पोकळीत एक विचार चमकून गेला ...
लगेच ती उठली..फ्रेश झाली..खिडक्यांचे पडदे उघडले..घरात उजेड पसरला...दोन मिनटात पूर घर आवरून घेतलं तिनं. तयार होऊन ती बसून राहिली परी उठण्याची वाट बघत ... नेहमीप्रमाणे परी उठली. मम् मम् मम्...करत पाळण्यात हातपाय हलवत बसली...
अरे आमचं पिल्लू उठल तर... लब्बाड कुठली !!!
गरम पाण्याने टब भरला...छान अंघोळ झाली परीची..नवीन कपडे घातले परीला पावडर लावली गालाला काळा टीका लावला ...
पायऱ्या झपाझप उतरून खाली आली...
मस्त चालत दोघी मायलेकी समुद्र किनारी आल्या..सगळीकडे प्रेमीयुगुलांची गर्दीच होती ..तारुण्याचा बहर फुलला होता त्यात खरी गुलाब किती आणि प्लास्टिकचे किती असा विचार करून त्यांच्यातून वाट काढत ताठ मानेन न संकोचता ती एक फुलवाल्या पाशी जाऊन उभी राहिली...भैया एक गुलाब देना....गुलाब देताना..भैय्याने विचित्र नजरेनं पाहिलं. .ती सरळ समोर चालत गेली वाळूत बसून परीला मांडीवर घेतली ...
WILL YOU BE MINE VALENTINE...असं म्हणून परीच्या हातात गुलाब दिला...परीनं घट्ट पकडून ठेवला तो..तिला तिचा व्हेलेंटाईन सापडला होता....
नजर विस्फारून तीन समोर पाहिलं ...
क्षितीजाच्या पलीकडून तो गालात हसत होता ...
हे सरप्राईज तिन त्याला दिल होत ......