विनया जियो...सुंदर लेखन....एका स्त्रीची नाजूक भावना किती अल्लद पकडली आहे शब्दात
स्पर्श – विनया पिंपळे
सुरुवातीला सहज म्हणून बोलता बोलता ओळख झाली आणि नंतर बोलता बोलता सहज म्हणूनच मैत्री सुद्धा !!
निरोप घेताना अगदी सहज म्हणूनच त्यानं हात पुढे केला आणि तितक्याच सहजपणे संस्काराचे, संस्कृतीचे असंख्य डोळे आतून-बाहेरून सर्वांगभर रुतल्याचं तिला जाणवलं. तिनं उत्तरादाखल हसत हसत हात जोडले. 'हुश्श!' म्हणत सगळे डोळे आपोआप मिटले गेले.
.... पण 'आपण हातात हात घेतला असता तर ...!! ....तर कदाचित ...
गेल्या कित्येक वर्षांपासून या 'कदाचित' नंतरच्या झुळझुळत्या मोहक स्पर्शापाशी तिचे मन अडकून आहे. एकटीच्या एकांताला सोबत म्हणून का होईना .... कुणीच डोळे उघडत नाही.