एका छोट्या संवादातून किती भयाण वास्तव गौरीने चित्रित केले आहे...व्वा!
अपेक्षा - गौरी लहुरीकर
ती- अय्या किती छान!
तो- मला मुळात घरचंच खायला आवडतं
ती-बरं, बरं करेन की..
तो- आँफिसात खूप काम असतं, उशीर होतो कायम.. . ती-हो का..ठीक आहे
तो- बाहेर वगैरे जाणं विसर...जमणार नाही
ती- हं हरकत नाही!!
तो- सगळं सांभाळावं लागेल तुला, घरची,बाहेरची कामे
ती- त्यात काय सोप्पं आहे
तो- सिनेमा, नाटक ,खरेदी सगळं विसर...असल्या गोष्टीत माझा रस नाही
ती- नसू दे, किती पहाणार
तो-बस,एवढंच सांगायचं होतं तुला, बाकी काही अपेक्षाच नाहीत माझ्या, निघूया!!
ती- हो... लगेच...डोळ्यांचं आभाळ भरून येण्याआधी....!!