शब्दांचे कंगोरे झिजले की भावना बोथट होतात.....अशा वेळी स्पर्श कामी येतो....
शब्द - राजश्री जोगळेकर
“पण तू का गप्प बसलीस? तोंड नव्हत का तुला बोलायला?” मी चिडूनच विचारलं.
“कायबोलणार? शब्दांचे आकार हरवलेत ग. ते झाले आहेत नदीच्या प्रवाहातल्या गोट्यांसारखे गुळगुळीत, जिथे जातात तिथे काहीही खूण न ठेवता परत येतात. काय बोलू मी?” ती हताश सुरात बोलली.
मी काही न बोलता तिला जवळ घेतलं आणि तिच्या पाठीवर हात फिरवत राहिले.