एखादी कथा जाणता अजाणता - एक क्रूर सत्य...फसलेल्या साथी मधले एक विलक्षण सत्य दाखवून देते...तसेच काहीसे झाले मला.
अग्निहोत्र – मंजुषा अनिल
कित्ती काय काय मागता येऊ शकत होतं त्याला. त्यांच्या गप्पा, दोघांच्याच गाण्याची मैफिल, एक छानसं हसू.
त्याने मागितले तिचे घाट..तिची वळणं. रिता झाला न पाठ फिरवून झोपी गेला.
कित्ती काय काय मागता येऊ शकत होतं तिला. एखादा गजरा, एक लॉंग ड्राईव्ह, छोटे छोटे आनंद.
तिने मागितले त्याचे उधाणलेले श्वास. सैलावली न त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघत झोपी गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी दोघंही आधीसारखेच असंतुष्ट...पुन्हा पेटण्यासाठी विझलेले अग्निहोत्र जणू.