Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

इमान-संजन मोरे

$
0
0

आज भूक केंद्रबिंदू असलेली दुसरी कथा...संजनने वाघ्याचे व्यक्तिमत्व काय रंगवले आहे...आणि कथा सुरु होते एके ठिकाणी..पण अनोखे वळण घेऊन वेगळ्याच टप्प्यावर संपते....

इमान-संजन मोरे

हातावर पाणी पडलं, उठलो, तंबाखू मळली. स्वेटर, कानटोपी घातली. कुत्र्याची भाकरी, टॉर्च, मफलर, पिशवीत टाकली. लूनाला किक मारली. सायकलने बरेच दिवस साथ दिली होती. वझ्यालापण दमदार होती, पण आता गुडघे दम काढत नाहीत. म्हणून ही लूना घेतली. वापरायला सोपी. गियरची झंझट नाही. थंडीचा कडाका वाढायच्याआधी रान जवळ केलं पाहिजे.

रानाचा पसारा मांडून ठेवलाय पण करायला माणूस नाही. शेती पडून तरी कशी ठेवायची, लोक तोंडात शेण घालतील. पोरं म्हणतात विकून टाका, बॅंकेत पैसे टाकून आरामात व्याज खात बसा. नोकर्याप बघत आम्हाला शेती जमणार नाही. हा आतबट्ट्याचा जूगार खेळायची गरजपण नाही. दिवसेंदिवस मजूरांची बाजीरावकी वाढतच चाललीय. खुरपणीच्या बायकांचा तोरा वेगळाच. अकराला जूपी करतील, पाच वाजल्या की चूळबूळ चालू. आवराआवरी सुरू. बोलायची टाप नाही. गड्यांचपण तसंच. तंबाखू खाणार, पाणी पेणार, जेवायला सुट्टी, जेवल्यावर विश्रांती. मग पुन्हा तंबाखू पाणी, बीडी काडी. टिवल्या बावल्या करत दिवस भरायचा. पगाराच्या दिवशी दारात हजर. आठवड्याची सुट्टी. आपण मात्र कायमस्वरूपीचे मजूर. आपला पगार कोण करणार? काळी आई भरभरून देते. आपल्याला, सगळ्यांना जगवते. पण आता दगदग सोसवत नाही, हातपाय कट कट वाजतात. गडी रात्रीला थांबत नाही. पण आपल्याला थांबलंच पाहिजे. गुरे आहेत. उशीरा लाईट येते. रात्रीचं भीजवन उरकतं. रान कमी पाणी पेतं. गड्यांच्या जीवावर कसली शेती ? आपण आहे, करता येईल तोवर करायची. हात पाय थांबले की थांबायचं. करण्यासारखं येवढंच आहे आपल्याकडे ! पुढच पुढं. …..

लूनाचा आवाज आला तसा वाघ्याने कालवा केला. गाडी लावली, वाघ्या दम काढत नव्हता. साखळीला हिसके देत होतं, झेपा घेत होतं. वाघासारखं जनावर पण पोटासाठी केवीलवाण होत होतं. कंदिल लावेपर्यंत साखळी तोडतंय की काय, असा वाघ्याचा नूर होता. ताजी भाकरी, दूध, मचकमचक आवाज करत खावू लागलं. मध्येच समाधानाची गुरगुर घशातनं काढू लागलं. कुडाच्या भींतीच्या फटीतून गार वारं भरभरत आत घूसत होतं. थंडीचा कडाका आता जास्तच वाढत जाणार. वाघ्याचं खावून झालं होतं. त्याची साखळी सोडली. वाघ्या उधळला. रानभर झाला. हात गारठून गेले होते. घमेलं घेतलं, त्यात लाकडाची खोडकं, ढपल्या टाकल्या. गंजीतल्या वैरणीच्या पेंढ्या मोडून गुरांच्या पुढे ठेवल्या. जर्सींपुढे भूसा वलवून ठेवला. गोळीपेंड सकाळसाठी. सरमाडाची एक पेंढी मोडून घमेल्यातल्या खोडकावर टाकली, मग काडी लावली. सरमाड पेटलं. चटचट करत जळू लागलं. उब आली. तंबाखूची गुळणी धरून निश्चितीने शेकत बसलो. सेलवरचा रेडिओ. गाण्याचं केंद्र लावलं. अंग गरम झालं. बाजेवर बिछाणा पसरला. उशाला टॉर्च ठेवली. पडलो.

आता खोडकं जळू लागली होती. रात्रभर हे निखारे रसरसत राहतील. छपराची खोली गरम राहील, रेडिओ उशीरा कधीतरी आपोआप बंद होईल. दरवाज्यात वाघ्या आहेच. विच्चू काटा आत येवू देणार नाही. आपल्या मालकीच्या कस्पटालासुद्धा कुणाला हात लावू देणार नाही. फाडून खाईल ! इमानी जनावर. पगार ना पाणी ! तीन टाईम पोटाला घातलं की आपलं सगळं इमान धन्याच्या चरणी. जनावर माणसापेक्षा लाखपटीने भलं ! …………...


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>