मृणाल ची ही फिरस्ती प्रथमच एक काव्यात्मक फिरस्ती झाली आहे...
विक्रम
'त्या बकुळीच्या झाडाखाली.............' - मृणाल वझे
सकाळचे ६ वाजलेत. आज थंडी खूपच पडली आहे.
मी आज तिची जरा लवकरच वाट बघते आहे . मी माझ्या वासात धुंद होऊन गेलेय.
ती येईल बरोबर ७.३० वाजता. माझ्याकडे बघेल, एक दीर्घ श्वास घेईल. माझा गंध पूर्ण शरीरात साठवून घेईल.
एक एक करून मला वेचेल, प्रत्येक वेळी मला वेचताना ती कोणाच्या तरी आठवणीत विरघळून जाते, दर वेळी मी तिला जागे करायचा प्रयत्न करायला जाते, पण नंतर थबकते!
तिची समाधी भंग करण्याचा मला काहीच अधिकार नाही.
थोड्यावेळात तिला वेळेचे भान येते, आम्हा सर्वाना आपल्यात सामावून न घेता आल्याने तिचा चेहेरा दु:खी होतो.
तरीपण ती गुणगुणत उद्या यायची हमी देते !!!!
'त्या बकुळीच्या झाडाखाली.............'