व्यवहारी जग आणि ज्याला आपण आपले अंतस्थ...जग म्हणतो...त्याची ही गोष्ट....कधी कधी आठवण जगण्याचे कारण ठरू शकते...
विक्रम
तुझी आठवण - कल्पि श्याम जोशी
काय करणार, नव-याचा तुटपुंजा पगार, घरात खाणारी दोन अधिक दोन चार तोंड, त्यात त्यांचं व्यसन!! सासू सासरे म्हणतात लग्नानंतरच हा असा वागतो आहे,जरा प्रेमाने वागत जा ......काय करू? मी आतून किती रिती रिती आहे,यांना काय माहित?
कुठून आणु प्रेमाची ओसंडते मापं ..तूझे बर आहे, मला विसरण्यासाठी, भटकंती करतोस, गावोगावी ..........मी घर, एका चौकटीतली कामं, पून्हा घर ..तोच चहा तीच कपबशी ..अन त्या मळक्या वाफ़ा ....खोकल्याचा जागर, मनाचाच मरण.
त्यातही तूझी आठवण मात्र आत तशीच जपून ठेवलेली,घाईगर्दितही ती भेटून जाते.
आणि आज प्रत्यक्ष तू बोलतोय....हा आनंद मी मी जपून ठेवेन रोजच्या धकाधकीत.....................