मंजुषा अनिल ह्यांचे नुक्कडवर सहर्ष स्वागत आहे...लघुतम कथेत त्यांची कथा वरचढ ठरावी...अशीच.
विक्रम
प्रतिमा - मंजुषा अनिल
नोकरीचा कागद धरून ती त्याच्यासमोर उभी राहिली.
तिला दिसत होतं त्याचा अभिमानाने भरलेला आनंदी चेहरा...
आणि त्याला दिसत होतं तिचं पांढरं कपाळ...