कथा आता शेवटाकडे प्रवास करते आहे...बघूया काय होत ते...
विक्रम
बदफैली – निशा गायकवाड
भाग - ६
"कसलं ट्रॅफिक झालंय ना आजकाल?....कधी आलास?" अपर्णाने स्वतःच्या उशिरा येण्याबद्दल उगीच काहीतरी कारण दिल...
"दुपारी तीन वाजता ..स्ट्राईक मुळे सुट्टी दिली अर्ध्या दिवसाने ....मला वाटत मला दुसरं काम शोधावं लागेल.. ....ह्या स्ट्राईक मुळे खूप नुकसान होतंय..."
"अरे होईल सगळं सुरळीत..... नको काळजी करू.."
"एक महिना झाला....अजून किती दिवस "
"तू शांत हो...मी मस्त चहा करते...आपण जरा बाहेर भटकून येऊ.. बर वाटेल तुला”
सोहमचा फोन आता अपर्णा स्वतः टाळत होती...मेसेजला रिप्लाय देत नव्हती......पण सोहम मात्र तिला सोडायला तयार न्हवता....एक दिवस सोहमनेति असा काही झटका दिला ..किती पूर्ण कोलमडून गेली....त्यादिवशी तिच्या नावाने एक कुरियर आलं जे सोहमने पाठवलं होत...ऑफिस सुटल्या नंतर ती सोहमला भेटली...
"अपर्णा प्लिज रडू नकोस...हे बघ मला तुझी काळजी होती...म्हणून मी तुला मदत करतोय...."
"अरे पण अशोकने असं का केलं...मी कुठे कमी पडले सोहम....मला सांग मी आणखीन किती समजून घेऊ त्याला?.....नाही ह्याचा जाब मी विचारणार. नाही सोडणार त्याला...."
"अपर्णा हे बघ तू त्याला अजिबात काही विचारणार नाहीयेस तो कबुल नाही होणार ग...."
"का नाही कबुल होणार?.....हा धडधडीत पुरावा आहे माझ्याकडे........तोंडावर फेकेल मी त्याच्या.. "
"त्याने काय होईल? तो तुझी माफी मागेल......तुझ्या समोर रडेल.....मी चुकलो...मी पुन्हा असा नाही वागणार असं म्हणेल......तू लगेच विरघळून जाशील आणि त्याला माफ करशील..."
"मग ...आणखीन काय हवंय .. ..तेच तर पाहिजे ना मला?...त्याची चूक त्याला कळली म्हणजे झालं ...." अपर्णाने आश्चर्याने विचारलं.. "तू ना एक नंबरची बावळट आहेस ...तुला काय वाटत...तुझ्याकडे कबुल करून तो लगेच हे सगळं थांबवणार आहे......उलट तो तुला सतत फसवत राहील...कळलं ?"
"मग..मी काय करू सोहम?"
आता सोहमने त्याची जवळ जवळ लढाई जिंकली होती...अपर्णा त्याच मत विचारात होती.
"तू त्याला काहीच बोलणार नाहीयेस...त्याला काहीच विचारणार नाहीस...तूला काहीच माहित नाही ...ते पुरावे देखील लपवून ठेव...... ..त्याला काहीही कळता कामा नये..फक्त,,,त्याच्या ढोंगी पणापासून ...स्वतःला सावध ठेव...बस्स .."
"त्याने काय होईल?......तो स्वतःहून तर हे सगळं नाही ना थांबवणार "
"नाही थांबवणार तो स्वतःला...आणि तुला आता त्याच्या जवळ मी ठेवणार पण नाही...."
"म्हणजे?"
"तुला अजूनही त्याच्या बद्दल सहानुभूती वाटतेय अपर्णा? .....तो तुला इतकं फसवत असताना देखिल?..जो माणूस तुला मूर्ख बनवतोय.. तुला त्याच्याच जवळ राहायचंय आणि मी मात्र तुझ्यासाठी इतकं काही करतोय....माझं इतकं प्रेम आहे तुझ्यावर मला मात्र तू ....अपर्णा ..हे मी सर्व तुझ्यासाठीच केलं...मला अशोक वर थोडा संशय आधीच आला होता...तो तुझ्याकडे का लक्ष देत नाही? मला वाटत होत नक्की पाणी कुठे तरी मुरतंय....म्हणून मी त्याच्यावर पाळत ठेऊन होतो...आणि पुरावा तुझ्या समोर आहे....आता तरी विचार करशील माझा ?...मला काय करायचंय ग तू राहा हवं तर अशोक कडे पण तो सुधारेल ह्याची काय तुला शाश्वती आहे? ...बघ विचार कर ..चल तुला घरी सोडतो...."
अपर्णा सोहम सोबत टॅक्सित बसली...ती रडत होती...सोहमने तिला आधार देण्यासाठी तिचा हात हातात घेतला...पण तिने लगेच हात बाजूला घेतला आणि सरकून बसली...नंतर मात्र सोहमने तिला स्पर्श केला नाही....
अपर्णा घरी आली...अशोक घरी नव्हता. तिने त्याला फोन केला पण त्याचा फोन बंद येत होता...
त्यादिवशी मात्र अशोक रात्री दहा वाजता घरी आला...
"आज संपलं वाटत स्ट्राईक कंपनीचं....?"अपर्णाने अशोकला आल्या आल्या विचारलं .
"हो संपलं..ना...टेन्शन गेलं .... हे काय तुझा चेहरा का असा ओढल्यासारखा दिसतोय..रडलीस का?."
अपर्णाला आठवलं तिला अशोकला काही विचारायचं नव्हत..
"नाही जरा असच बर वाटत नाहीये......तुझा फोन का बंद होता..." अपर्णाने लगेच विषय बदलला .
"बॅटरी डाउन झाली ...म्हणून ..का?"
अपर्णाला काही कारण ते पटलं नाही...
त्यानंतर ती अशोकच्या प्रत्येक वागण्यामागचं कारण हे तसच गृहीत धरू लागली....
सोहमच्या भेटीगाठी साहजिकच वाढल्या....ती अशोक बद्दल....त्याच्या वागण्याबद्दल...सगळं सोहमला सांगायची...आज काय तर लवकरच गेला.....काल खूपच उशिरा आला....सतत गाणंच काय गुणगुणत असतो.....आजकाल जेवणाकडे देखील लक्ष नसत.....आणि सोहम तिच्या प्रत्येक सांगण्यामागे........पाहिलस माझ्यामुळे तू सावध झालीस......नाहीतर त्याने तुला आणखीन किती वर्ष फसवलं असत.....वगैरे ...बोलायचा.
अशोकला देखील अपर्णाचा वागणं बदल्यासारखं वाटत होत..पण तो काही बोलत नव्हता...त्याला त्याच काम पुन्हा सुरु झाल्यामुळे...त्यातच तो खुश असायचा.... तिचा फोन सतत एन्गेज लागण.....घरी आल्यावर देखील तीच सतत मोबाईलवरच लक्ष असंण...मोबाईलचा पासवर्ड सतत बदलण....कधी चुकून तो लवकर घरी.आला तर तिच उशिरा घरी येणं.....त्याला थोडं विचित्र वाटत होत....पण तरीही तिला दुखवावंसं वाटायचं नाही...कारण त्याने तिला काही जरी विचारलं ....तरी देखील अकांडतांडव करायची....त्याला काहीही असंबंध बोलायची.... ज्याचा त्याला जास्त त्रास व्हायचा....
अपर्णा सोहमला भेटायची....ती देखील आता सोहम सोबत राहण्यासाठी त्याच्या सोबत लग्न करण्यासाठी तयार झाली होती... दोघे एकत्र जेव्हा भेटायचे तेव्हा सोहम तिला स्पर्श करण्याचा पुष्कळ वेळा प्रयन्त करायचा...पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती...आपण आधी लग्न करूयात ..त्या नंतर हे सर्व....सोहम तिला खूप समजवायचा लग्न तर करायचंच आहे....माझं हे काम होउदे ...ते काम होउदे ...नवीन घर बघुयात आधी...माझे जरा प्रॉपर्टीचे लीगल मॅटरचे निकाल लागू दे...एक्दोन हजार कारण तो तिला द्यायचा....
पण तरीही अपर्णाचा आधी लग्न मग बाकीचं...ती अशोकला सर्व सांगून टाकायला देखील तयार झाली होती...पण सोहमने तिला थांबवलं होत.....कारण त्याला अशोकची काय प्रतिक्रिया असेल ह्याचा अंदाज बांधता येत नव्हता.....त्याच्या आयुष्यात आलेल्या इतर विवाहित स्त्रियांचा त्याला ह्या बाबदीत कधीच त्रास झाला नव्हता. त्यांच्या नवऱ्यानी कधीही त्याला पाहिलं नाही.....पण इथे प्रकार वेगळा होता... त्याला वाटत होत...अपर्णाला जर आपण पैशांचं अमिश आणि लग्नाचं वचन दिल....तर अपर्णा आपल्या सोबत ते सर्व करायला तयार होईल......पण तिचा हेका बघून मात्र त्याची मनातल्या मनात चरफड होई.\
एकेदिवशी अपर्णाला रस्त्यात तिच्या माहेरची शेजारची काकू दिसली....अपर्णाची लहानपणापासून त्या काकुंशी खूप जवळीक होती.....दोघीना एकमेकींना बघून खूप आनंद झाला.....अपर्णाने तिच्या माहेरच्या माणसांची चौकशी केली....माहेरी सर्व ठीक असल्याचं कळलं.... पण अपर्णाची आई थोडी आजारी होती...आईला अपर्णाची खूप आठवण येत असल्याचं तिला भेटायची इच्छा असल्याचं तिने काकूंना सांगितलं होत... अपर्णाने स्वतःचा नंबर आईला देण्यासाठी काकूंकडे दिला.....बोलता बोलता सहजच काकूने अपर्णाला बाळ वगैरे झालय की नाही म्हणून विचारलं....अपर्णाला खरंतर....कित्तेक दिवस ह्या गोष्टीच भानच न्हवत म्हणजे सुरुवातीला वर्षभरानंतर दोघांनी चेकअप केलं होत.....रिपोर्ट्स आणायला मात्र त्या दिवशी अशोक एकटाच गेला होता......रिपोर्ट्स चांगले आहेत नॉर्मल आहे सर्व असं देखील म्हणाला होता .पण तरीही अजूनही अपर्णा आई होऊ शकली नव्हती..
काकूने तिला धीर दिला..होईल ग काहींना दहा वर्षानंतर देखील मुलं होतात...तू तर अजून लहानच आहेस....... होईल नको काळजी करुस....काकू भेटल्याचा तसेच आता आपल्याला आईशी बोलता येईल....म्हणून तिला खूप आनंद झाला होता.....
उत्साहातच आज ती सोहमला भेटली...आईला तिला भेटायचंय.. आईशी आता बोलता येईल ही गुड न्यूज तिने त्याला दिली.....सोहमला त्याच सोयरसुतक नव्हत.....तो तिला आज देखील विनवत होता...
"अपर्णा तू खरच प्रेम करतेस ना माझ्यावर"
"तुझ्या गळयाशप्पत..." आणि ती हसली..
"अशी गोड हसत नको जाऊस माझ्या काळजाचं पाणी पाणी होत.." असं म्हणून तो तिच्या जवळ सरकला...
"तुला कितीदा सांगितलंय सोहम तू असा माझ्या जवळ नको येत जाऊस मला नाही आवडत.."
"आताच म्हणालीस ना प्रेम करतेस मग माझा स्पर्श इतका नकोसा वाटतो का तुला"
"तस नाही सोहम.....पण आपण लग्न करूयात ना आधी मग हे सगळं...प्लिज"
"सारखंच काय ग लग्न...लग्न...तुला काय वाटत मी खोटं बोलतोय का तुझ्याशी...किती प्रॉब्लेम्स आहेत एकतर लाईफ मध्ये...आणि तुला भेटतो तर तू साधा हातही लावू दे नाहीस ..."
"म्हणजे काय...प्रेम आहेना तुझ.....मग प्रेमात ह्या गोष्टी इतक्या महत्वाच्या असतात का.....तुला मी भेटते...हे नाही का महत्वाचं..तुला कितीदा सांगितलं.. मी अशोकला स्पष्ट सांगते....तर तुझं आपलं वेगळंच चालुये ...मला तर कधी कधी शंका येते तुझ्यावर..."
"असं काय करतेस अपर्णा....नको घेऊस माझ्यावर शंका....मी खरच अडचणीत आहे ग मला समजून घे.." असं म्हणून तो पुन्हा तिच्या जवळ सरकणार तेव्हढयात अपर्णा उठली...मी घरी जातेय ...खूप उशीर झालाय.... अशोक आला असेल तर तो खूप प्रश्न विचारतो...त्याला आता माझी शंका पण यायला लागलीये.....आणि मला रोज असं हाल्फडे टाकून निघता नाही येणार....तू लग्नाचं ठरव लवकर...निघते मी ..."