Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

प्रार्थना – मृणाल वझे

$
0
0

मृणालची ही कथा वाचून विलक्षण हललो मी

विक्रम

प्रार्थना – मृणाल वझे

नमिताने कुकर उघडला. गरम गरम भात पानात वाढला. वरण हिंग मीठ घालून सारखे केले. भातावर वरण तूप घालून त्यावर लिंबू पिळून छान मऊ मऊ भात कालवला. ताटात एक दह्याची वाटी, त्यात भरपूर साखर घालून वाटी ताटात ठेवली. साखर ढवळलेली आवडायची नाही आईला. एका पोळीचे तुकडे करून वाटीच्या बाजूला ठेवले. आईकडे खोलीत जाताना नमिताचे पाय जड झाले होते. भयंकर काहीतरी छातीवर दडपण आले आहे असे वाटत होते. अर्थात हे रोजचेच होते!

आईच्या खोलीकडे जाता जाता मधेच तिने ते ताट टेबलावर ठेवले आणि देव्हाऱ्या समोर उभी राहिली. डोळे गच्च मिटून घेतले आणि देवाकडे रोजचे मागणे मागू लागली.

पुन्हा एकदा जड पायाने ती आईच्या खोलीकडे निघाली. आई बेडवर सगळ्या बाहूल्या… भातुकलीचा खेळ पसरून बसली होती. परकर वर गेलेला… बाहुली उभ्या पायावर घेऊन आई तिला तेल लावत होती. तिने ताट हळूच शेजारच्या टेबलावर ठेवले. तिचा परकर सारखा केला. बाहुली उचलताच तिने भोकाड पसरले. रोजचेच संवाद सुरु झाले…….

" चल मनू जेवायला …बघ मी आज काय आणलय! दही साखर आवडतेना तुला? साखर पण भरपूर घातलीय. चल चल पटकन " आई ढीम्म हल्ली नाही.

मग पुढची पायरी … " आता ओरडेन हं मी मनू तुला " तरीसुद्धा तिचे रडणे थांबलेच नाही !!!

आता शेवटचा टप्पा तिने जेवायलाच हवे म्हणून ! नकोसा ! पण हा टप्पा रोज गाठावाच लागतो ….

" मनू आता मात्र एक फटका हं !" शेवट एक मांडीवर फटका …. " माझा हात का झडून जात नाही रोज " नमिता मनातल्या मनात पुटपुटली. पण या फटक्याने मात्र रोजच्यासारखे मुकाट शेवटी जेवण संपले. नमिता आईचे तोंड पुसून बाहेर आली. हात धुतले आणि पुन्हा एकदा देवासमोर उभी राहिली. फडाफड दोन तोंडात मारून घेतल्या. " रोज मला हे मरण देण्यापेक्षा तू तिला कारे तुझ्याकडे बोलवून घेत नाहीस. जेवण घेऊन जाताना रोज हेच सांगते.रोज वाटते आज तू माझी प्रार्थना ऐकली असशील, पण तुला कधीच दया येत नाही कारे माझी! कुठली मुलगी मरण मागेल रे आपल्या आईचे …"

नमिता पुन्हा एकदा हताश होऊन वाट बघत बसली दूसरा दिवस उजाडण्याची ….


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>