Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

क्षुल्लक – कल्पी जोशी

$
0
0

काल्पिताई आमच्या कुटुंबाच्या जेष्ठ सभासद...पण त्याही पेक्षा खूप संवेदनाक्षम लेखक आणि वाचक....त्यांची कथा पोस्ट करताना मला खूप आनंद होतो...

विक्रम

क्षुल्लक – कल्पी जोशी

घरात गरिबी, आज चुल पेटली तरी उद्याच्याला काय ही काळजीच. आम्हा भावंडात मलाच जास्त काळजी करायची सवय़ होती. देवाजवळ दिवा लावायला गेलेली बहिण मला बघुन चाचपत होती..कारण अरे आपल्या भाजीला तेल नाही मग तो दिवा का वात भिजुन तरंगेपर्यत तेलात लावायाचा हे माझे नेहमीच वाक्य..उदबत्तीचे मी अर्धेअर्धे तुकडे करुण ठेवायचो. अगोदरच देव आहे ना मग त्याला दिवा का लावायचा? हवा असेल तर तेल दे म्हणावं . आई इतर भावंडे मला चमत्कारिक नजरेने बघायची.

देव आणि श्रध्दा त्यांच्यात ठसठसून भरली होती. त्याला कारण आई. मी नामानिराळा. नेहमीच नमस्कार करायचो, नास्तिक नव्हतो. पण घरात दमडी नसतांना देवळात रुपया का टाकायचा? या मताचा मी. आई गहु निवडत बसली की सुपातले बारिक दाणे इकडे तिकडॆ पसरायचे. माझा वेळ मी त्या एकएक दाण्याला वेचण्यात घालवायचो. सकाळी भल्या पहाटे मी काटक्या गोळा करायचो.........छोटीशी लाकडाची मोळी सुध्दा आशाळभूत नजरेने बघायचो.

शाळेतून येता येता.......खाऊच्या दुकानाजवळ कधीच थांबलो नाही..... अशातच शेजारचे बंगल्यातले आजोबा वारले.............त्यांना स्मशानात नेतांना लोकांचा ताफ़ा आणि मागे लाकडाचा ट्रक बघितला. का कुणास ठाऊक मनाला एक अनामिक भिती स्पर्षुन गेली,,,,,,,,,अरे देवा आई गं! याला पण पैसाच लागतो.

एकदा आईने बाजारून लिंबु आणायला सांगितले ........बहुतेक मोठ्या ताईला पोट दुखण्याचा त्रास आहे असे म्हणाली ती. मी तिन चार दुकाने फ़िरलो जिथे स्वस्त आहेत असे वाटले तिथुन लिंब घेऊन निघालो. पुन्हा एक लिंबवाली “चाराण्याला सहा” ओरडत होती....हातातले लिंब घेऊन तसाच उभा राहिलो......पुन्हा घेणार होतो ती मोजुन देत होती. माझ्या हातातल्या लिंबाकडे बघुन म्हणाली मी देत होते ना? तू का घेतलेस? माझ्या मनाला हे वाक्य बोचले. मी चोर नाही काकू .हमसुनहमसून रडू लागलो. लोक गोळा झाले..............मला कुणी जवळ घ्यावे असे कुणीच नव्हते त्या गर्दित.

इतक्यात एक काका आले. पाठीवरुन हात फ़िरवत म्हणाले उगं बाळा खरच तू चोर नाहीस. तु ज्या ठीकाणाहुन लिंब घेतलेस त्या दुकानात मी पण होतो. गर्दिच्या नजरा आता काकुंकडे भेदक नजरेने बघु लागल्या........माझ्यावरचा आळ काकुंनी परत घेतला हे बघुनच मला इतका आनंद झाला की मी बाजारातून पळतपळत थेट घरी आलो...मला आता आई हवी होती. तिला शोधले घरभर ती नव्हती,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,ती ब-याच उशिरा पदराने घाम पुसत घरात आली तेव्हा माझा आनंद मावळला होता.........

पण आई मला बघुन सुखावलेली होती. तिला आता मी हवा होतो........खुप प्रेमाने सोनुल्या हाक मारतच घरात शिरली. मला कुशित घेतले आणि डोळे बंद करुन किती तरी वेळ शांतच होती............

माझ्या हातावर तिच्या अश्रुंचा स्पर्ष झाला. एव्हाना दुपारची गोष्ट सौम्य होत शुल्लक झालेली होती!!


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Latest Images

Trending Articles



Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>