ही एक खूप वेगळी आणि खरच समाधान देणारी गोष्ट आहे...जरूर जरूर वाचा....
विक्रम
समाधान !!! – नम्रता कुलकर्णी
तो तिथे बसलेला असायचा...त्याची जागा सुद्धा ठरलेली.....बाजूला पुस्तकांचा ढिगारा....कितेक वर्ष त्या पुस्तकांशी खेळत होता....सगळी पुस्तक पेनाच्या रंगांनी रंगली होती......तो खूप मेहनत घेत होता..पुस्तकांच्या झालेल्या पत्रावळ्या त्याची साक्ष होते...
वर्ष हळू हळू सरत होती...बरीच नवीन मूलं तिथे येत होती...जुनी मंडळी तिथून जात होती....पण त्या खुर्चीतली त्याची जागा त्याचीच होती....त्याच्या पुस्तकांचा वास सगळी कडे पसरला होता...पुस्तक त्याची पाठ सोडत नव्हती ....
तो ही मोठा झाला होता...त्याला नोकरी लागली...त्याचं लग्न झालं...ह्या सगळ्या प्रवासात ती पुस्तक मात्र त्याच्या सोबतचं होती....
ज्या कॉलेज मध्ये तो शिकला....ज्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसून अभ्यास केला....तिथेच त्याला प्राध्यापक म्हणून शिकवण्याचा योग ही आला. पण लायब्ररी मधली त्याची ती जागा आणि त्याची पुस्तक हे समीकरण काही केल्या त्याच्या कडूनं सुटत नव्हतं....
वयाच्या एकवीस वर्षा पासून घेतलेला त्याचा ध्यास काही संपत नव्हता. तो स्वतःच स्वतःशी लढत होता. प्रश्न त्याच्या विश्वासाचा होता!
आता त्याला सगळे(ज्यांना तो ही ओळखत नव्हता) असे सगळेच त्याला... त्या कॉलेजचा लीजंड म्हणून ओळखु लागले.
त्याच्या वयापेक्षा नऊ वर्ष लहान अशा मुलाने एक दिवस मात्र, त्याला विचारलंच -'इतकी वर्ष त्या एका डिग्री साठी तू मेहनत करतोयस, पण तुला यश नाही आता तुझ्याकडे छान नोकरी आहे, तू सेटल आहेस...तरी का तुला ती डिग्री हवी आहे? सोडत का नाहीस त्याचा नाद...ती डिग्री आता मिळून सुद्धा ...काय मिळणार आहे तुला....????
त्यावर त्या लिजंड ने उत्तरं दिल: समाधान!! ती डिग्री मिळाल्या नंतरच..., आत्म-समाधान!!!!
आणि त्या मुलाच्या पाठीवर हात थोपटत तो निघून गेला...
त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत....कॉलेजच्या त्या भक्कम वास्तूने समाधानाने मायेचा हात त्याच्या पाठीवरनं फिरवला.....
तिला त्याच्या आत्मविश्वासावर विश्वास होता......