2९ फेब्रुवारी उलटून गेली आहे...पण कथा तितकीच शाश्वत आहे...
विक्रम
न जगलेला दिवस – स्वाती धर्माधिकारी
माघात पाऊस. विजा आणि काय काय. मनात आलं हा पाउस बेमौसमी, अन शेडूल्ड! असा पाउस ज्यात भिजताही येत नाही, रमताही येत नाही! असे कित्येक क्षण .अचानक येणारे, अभोगी!
आठवणींच्या पावलांवरून चालत जावं वाटलं आज असंच...अनशेडूल्ड.....तो...तो, रस्ताच दिसेना, हा दिवस आधी उगवलाच नव्हता म्हणे, फेसबुकच्या इतिहासात!
आठवणीच नाहीयेत .......
म्हणून केवळ हे चार शब्द लिहितेय, की पुढे चार वर्षांनी जावं वाटलंच माग काढत मागे, तर असावी एखादी तरी पाउल खूण या फेसबुकावर, नाहीतर २९ फेब्रुवारी कधी जगलोच नाही की काय शंका यायची!!
एखादा दिवस असावा असाच हरवलेला आयुष्यातला , शोधून सापडू नये ......
आणि अचानक एखादी बाळमुठ उघडावी समोर आणि त्यात लपल्या अनमोल ठेव्यागत २९ फेब्रुवारीने देखील म्हणावं .............कुक ........मी इथे!