एक रविवार असा ....एक रविवार तसा...!!!!
विक्रम
रविवार - सागर मेहता
व्वा!!! काय स्वप्नवत रविवार होता ना आजचा.
सकाळी जरा निवांतच जाग आली...रात्रीच वाचून संपवलेल्या कादंबरीतील कथा अजुनही मनात घोळत होती...जुनी गाणी ऐकत वाफाळलेल्या चहाचे झुरक घेत निवांत वेळ घालवला...अळमटळम करत पुढे ढकललेला आंघोळीचा मुहूर्त उगवल्यावर ती आन्हीके झटपट आटोपली…
साग्रसंगीत जेवणावर आडवा हात मारला...जड झालेल्या डोळ्यांना दुपारच्या वामकुक्षीने जरा आराम दिला...संध्याकाळी मोकळ्या हवेत फेरफटका मारल्यावर मस्तपैकी गप्पांचा फड रंगला…
रात्रीचे जेवण उरकल्यावर छानपैकी रंगलेले पान चघळत टिव्ही समोर जरासा टेकलो तर…...
बातम्यांमधील बॉम्बस्फोटने छिन्नविछिन्न झालेले देह आणि बेंबिच्या देठापासून उमटणारे आक्रोश मात्र तेवढे पानातील सुपारीप्रमाणे मागे अडकून राहिले.