फिरस्ती मध्ये पाउलखुणांचा मागोवा येणारच न?
विक्रम
पाउलखुणा – संगीता गजानन वायचळ
हल्ली तू वाळवंटातून फिरतोस म्हणे
मी मागोवा घेऊ नये म्हणून
तुला माहित आहे
तू कुठेहि जा
तुझ्या पाउलखुणांचा अदमास मी घेणारच
मी तुझ्या मागोमाग येणारच
पूर्वी किनाऱ्यावरून जायचास
लाटेने पाउलखुणा मिटतील
नि थांबतील माझी तुझ्या मागची पाऊलं म्हणून ...
पण अरे हृदयावर अंकित झालेल्या तुझ्या पाऊलखुणा कशाने मिटणारेत ? ...
जा तू कुठेहि
वाळवंटातून का असेना तुझ्या हृदयात माझीही पाउलं रुतलीएत हे ठाऊक आहे तुलाही ...नि...मलाही