वाचा ही नुक्कड कथा..मी काही भाष्य करण्यापेक्षा प्रत्येकाने आपापला निष्कर्ष काढावा...
विक्रम
वंचना - गायत्री मुळ्ये
विणाच्या डोळ्यात जगभराच्या वेदना दाटल्या होत्या...आलोक आणि संपदा खाली मान घालून बसलेले...संपदाने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला....विणाने तिला हाताने खुणावून चूप.केले...ती आलोक समोरच्या खुर्चीवर येवून बसली...तिचे ओठ कापत होते....डोळे भरून आले होते...घश्यात हुंदका दाटला होता....ती बोलायचा प्रयत्न करत होती....पण बोलायला गेलो तर रडायला लागेल अस वाटून थांबत होती....मधेच अनावर झाले .तिने खालचा ओठ दातात दाबला.....पापणी मिटल्या....गालावर अश्रू ओघळले.....ती काही सेकंद तशीच बसली राहीली....पाणी संपू दिले...मग दोन्ही हाताने गाल पुसले....घसा खाकरला..
"तू अस करू शकलास माझ्याशी?विश्वास ठेवावा वाटत नाहीय पण उजळ माथ्याने ही मिरवतेय तुला म्हणजे जे तू केले ते खरेच न?" तिचे हे वाक्य ऐकल्यावर आलोक ने दोन्ही हात कपाळावर ठेवले...आणि खाली मान घालून तोंड लपवले...
संपदाचा हुंदका बाहेर पडला.. . "ऐक न ..विणा....माझ एकदा ऐक."संपदा...
"काही उपयोग नाहीय संपदा....ती ऐकून घेणार नाही..."आलोक बोलला मधेच
"ह ! खरच उपयोग नाही ग संपदा आता...तसही केंव्हाच उपयोग नव्हता ह्या विषयावर बोलून.....आणि मला समजले म्हणून इतके साळसुद पणे घेताय आता?नाहीतर तुमचे सगळे राजरोस सुरूच होते न?"
संपदाचे हुंदके वाढले....आलोक ने हाताची मूठ बांधून दिवाणावर आपटली..
विणा तिथून उठली....
दाराकडे जायला निघाली...संपदा झटकन उठली...तिचा हात धरला....
"विणा , विणा ,प्लीज ऐक माझे त्याशिवाय जाऊ नकोस .एक संधी दे सांगायची मला ."
"संपदा , तू मैत्रीण माझी. हा नवरा कमी मित्र जास्त. कधी बोलावस वाटले? आणि अगदी पहील्या क्षणाला बोलली असतीस तरी माफी नाहीच. मला आता मी दूर होणे हा एकमेव उपाय वाटतोय. मी जातेय. माफी कश्याची देऊ? मला फक्त एक सांग हे फक्त शरीरा पुरेसे जवळ येणे झाले का?" संपदाची नजर झुकली. विणा आत आली. आलोक समोर उभी झाली.
"सांग आलोक.हे फक्त शरीरा पुरेसे जवळ येणे होते का?खोट फक्त बोलू नकोस.तुझ्या आवाजातल्या उतार चढावाने मला कळत तुझ खर खोट." एक विचित्र शांतता त्यांच्यात पसरली...
"संपदा नाही बोलणार ग हा....घाबरतोय तो....तुला आणि मला दोघीनाही....तू सांग...हे फक्त शरीरासाठी जवळ येणे होते का?"
"नाही ."
खूप खोल दरीतून.आवाज आला संपदाचा
"मी कधी तुझ्या नवर्याच्या प्रेमात पडले माहीत नाही त्या नंतरच समर्पण केले मी. जरी तुझा विश्वासघात असला तरी माझ्या भावना प्रामाणीक होत्या आणि मला वाटत आलोकचे पण तसेच होते.मला जाणवत होती त्याच्या भावनेतील उत्कठता.आलोक ,बोल माझा जीव आता घुसमटायला लागलाय." विणा छद्मी हसली...आणि संपदाचा हात हातात घेवून दाबला.
"नाही विणा ...हा माझ्यासाठी संपदा बद्दल हा फक्त आवेग होता शरीराचा.मनाने मी तुझाच होतो ..आणि जर संपदा आपणहून सर्वस्व वहातेय तर मी एक पुरूष होतो..मी चुकलो ते हेच की तुझा विश्वासघात झाला. कारण मी शरीराने संपदाकडे आकर्षीत झालो."
..............
"संपदा ! इतकी अवाक नको होऊस. हे मी तुला सांगीतले असते तर खरे नसते वाटले म्हणून तुझ्यासमोर बोलायला लावले.ही संपदा तरी खरी आहे रे.निदान स्वत:च्या भावनांशी प्रामाणीक आहे ..पण तू ? तुला वाटतय असे सांगीतले म्हणजे मी तुला माफ करेल?नाही!शक्य नाही! आता तर अजीबात माफी नाही कारण तुला कोणाच्याच भावनांची कदर नाहीय.....असल्या माणसाला माझ्या आयुष्यात ह्या उप्पर जागा नाही."
विणा ताठ मानेने जायला निघाली...ती दारापर्यंत गेली...मागे वळून बघीतले....संपदा तिच्याकडे पहात होती .विणा परत आत आली.विणाने हात पुढे केला..दोघी एकमेकींचा हात धरून खोलीबाहेर पडल्या.
आलोक तिथेच सुन्न बसून राहीला.