आभासी जगातले हे जिवंतपण किती खरे आणि किती खोटे...हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे...
विक्रम
व्हर्चुअल जिवंतपण - अक्षय वाटवे
तुझं अस्थी विसर्जीन करून आलो त्या दिवशी संध्याकाळी...
तुझ्या फेसबुकच्या वॉल वर किती तरी पोस्ट साकळल्या होत्या…
we miss you... come back... परत ये.... एक पोकळी कधीही न भरणारी…
आमचा चांगला मित्र हरवला आणि बऱ्याच…
कित्येकांनी तुझे फोटोही टांगले…
शेकडो लाईक्स आणि कमेंट्स…
कल्पनाही नव्हती तू एवढा लोकप्रिय होतास की व्हर्चुअल जगात तुझ्या मरणाचा दुख्होत्स्व साजरा होत होता.
दिव्यावरून जाण्याऱ्या सुतावरून आणि फेसबुक वरच्या फोटोवरून माझी मेलेली नजर फिरली...आणि रिकाम्या ब्लॉक मध्ये मला माझ्या फिजिकल जिवंत पणाची शिसारी आली...
एवढ्यात पुन्हा वॉट्स अप वर पोस्ट किणकिणली... सहानुभूतीची... फिजिकली मेलेल्या तुझ्या व्हर्चुअल जिवंतपणाच्या अस्तित्वाचीच पोस्ट होती ती..
आता जितकी वर्ष आठवणीत राहील तितकी वर्ष व्हर्चुअली तुझं जिवंतपण आणि मरण साजरं करायला हवं... आणि इथे विसरायची परवानगी नाहीच नाहीतर रीमायंडर येतोच शेअर युवर मेमरीज चा...