कांचन धुरी ही नुक्कडला मिळालेली एक मस्त भेट आहे...ती लिहिते...चुकून सुद्धा कधी विचारत नाही...काका माझी गोष्ट कधी पोस्ट होणार...ती फक्त लिहिते...हे किती महत्वाचे आहे...!!
विक्रम
बिथरणे - कांचन धुरी
अनेक यशाची शिखरे सर करणारा तो आज एवढा बिथरला की, त्याने नकळत तिला आपलसं केलं.
ती रोज मादक अवतारात त्याच्या समोर यायची. पैसे मोजू लागला तो तिच्यासाठी... रोजच्या तिच्या साडीच्या नवीन रंगात तो स्वत:ला पार विसरूनगेला...
एकदा मात्र ती चक्क पांढरी साडी नेसून त्याच्या समोर आली...
आता मात्र त्याला हे कळून चुकलं की, ही आपल्यालाला कायमचं सगळयापासून तोडायला आली आहे.
तो बिथरला..
त्याच तेव्हाच ते बिथरण आणि आताच हे बिथरण दोन्ही एकसारखच होत...