ही कथा दररोज एक भाग अशी पुढील ४ दिवस येईल....निलेश औरंगाबादच्या कार्यशाळेतील लेखक....स्वागत आहे तुझे.
अनोळखी ती! – निलेश सारफळे
प्रस्तावना :-
अनोळखी ती? या नवीन प्रश्नाने मला थोडा हुरूप आला. एक सणसणीत विचार मनात आला कोणी अनोळखी व्यक्ती जर का, माझ्या जीवनात आली तर तिला मी माझ्याकडे कसा आकर्षित करणार ? याचा काही विचार? असं काय करता यईल कि तिला मी आवडेल ? माझा शांत वाटणारा स्वभाव आणि आजवर या गोष्टीत मी कधी अडकलो नाही मग या रिकाम्या डोक्यात कल्पना येणार तरी कशी ? स्वतःलाच हिणवत मी विचार करत होतो. पेन दाताने चावून आता पार भुगा होण्याच्या परिस्थितीत होता पण काही सुचत नव्हत ? थोडं निलेशरावांच्या माझा जवळचा मित्र आदर्शाकडे वळालो तो आता इथे असता तर त्याने हा विचार आधी केला असता कोण्या मुलीला विचारण्या आधी किंव्हा तिला आकर्षित म्हणा अथवा तिला मिळवण्यासाठी , १. प्रामाणिकपणा २. विश्वास ३. निस्वार्थीपणे मदत करणारं असं स्वतःच व्यक्तिमत्व असावं. ४. मी पणा बाजूला ठेऊन इतरांसाठी काही करण्यासाठी तत्पर राहणारा.
या सर्व गोष्टी पुढ्यात ठेऊन त्याने गोष्टीची सुरवात केली असती. म्हणून मी आता या गोष्टीचा विचार करून कुठे तरी काही तरी ताळमेळ बसवून काही लिहिण्याचा प्रयतन करावा म्हणून आतापर्यंत दातांचा मार खाणारी लेखणी लिहण्यासाठी सज्ज झाली.
१०:३० ला नेहमी प्रमाणे शहरात दाखलं. नाक्यावरच्या चहा वाल्याकडे आपला रोजचा कॉलेज ला जाण्या आधीचा चहा, मग पुढे चहाच्या वेळी एक मुलगी नेहमी डोळ्यासमोरून Bus- Stop कडे चालत जायची. नाक्यावरून Bus- Stop चं अंतर जेमतेम १ कि.मी. आणि माझं college वाटेतचं असायचं माझा चहा संपे पर्यंत ती पार अर्ध्या रस्त्यात जायची ती त्या चहाच्या टपरी पासून निघाली कि तिझ्या मागे चार – दोन पोरं लगेच बेफाम वेगात तिझ्या जवळून जायची ते नेहमीचं असायचं, कधी कधी वाटायचं या तरुणी खूप कष्टाने इथे शहरात येतात शिकण्यासाठी बाहेरगावा वरून.. आणि ही चार- दोन डोकी कशी विचित्र स्वभावाची असतील ना ? त्या कष्टाचं त्या रोजच्या जाण्या येण्याच्या प्रवासाची त्या दगदगीच्या त्रासाची काय किंमत कळणार यांना ? खूप दिवसापासून तिला बघायचो तिला. तिझ्या आणि माझ्या वेळेच्या गणितात कधी चुका व्हायच्या नाहीत न चुकता ती दिसायची आणि ते दृश्य रोज मला दिसायचं. जाता येता का कोणास ठाऊक पण एक कटाक्ष ठरलेला असायचा. त्या एका वळणावरून ती एका ठिकाणी आणि मी एका ठिकाणी कधी योग आला तर मी जायचो Bus- Stop वर चहा घेण्यासाठी. तिथे ती कधी कधी दिसायची. या Bus- Stop च्या गर्दीत कोणी कुणा साठी तर कोणी कश्यासाठी जमायचे मी मात्र फक्त चहा साठी तिथे हजेरी लावायचो. कारण इथला आणि नाक्यावरचा चहा आमच्या शहरात प्रसिद्ध आहे.
चार दिवस भासले नवे वाटले हवे हवे ........!