आज पुढील भाग...भाग - २
अनोळखी ती - निलेश सारफळे
पहिला दिवस :
आज नाक्यावर ती त्याचं वेळेत आली, पण तीझी झपा- झपा पडणारी पावलं मात्र आज खूप हळुवार गमतीशीर चाल करत पुढे सरकत होती. हल्ली कानात हेडफोन दिसत होता. आणि चेहऱ्यावर स्कार्फ. पण माझे डोळे चटकन हेरायचे तिला खूप जुन्या ओळखी प्रमाणे गर्दीत पण ती सापडायची, ती समोरून जात होती आणि रोडच्या पलीकडून अंजली अंजली ......... थांब म्हणत एक मुलगी तिला आवाज देत होती. मी ते पाहिलं आणि म्हंटल हिला सांगाव ती आवाज देतेय पण कानात हेडफोन आणि हीचं असं दिमाखात चालनं वेगळच वाटत होतं. दिवसेन दिवस बदल दिसत होता तिच्यात, मनातले विचार बाजूला सारून चहा चा ग्लास बाजूला सारत तिझ्या कडे थोडं अंतर चालत जाऊन समोर येऊन थांबलो. मी काही बोलणार तेवढ्यात हातवारे करून मला धक्का देत मुलगी परत तिझ्या मार्गाने पुढे......? मला तर तिझं असं वागणं बघून तिथेच घाम फुटला .... यार भलाईचा जमानाच नाही राहिला. ती टवाळकी पोरं चालतात यांना आणी आमची बाजू समजून न घेता सरळ सरळ झीटकारत पुढे ? तिझां हात धरला आणि समोरून रोड ओलांडणाऱ्या मुलीकडे बघत हात दाखवत इशारा केला ...... तेंव्हा कुठे स्कार्फ वगैरे बाजूला सारत कानातले ‘कवच कुंडल’ अर्थात हेडफोन बाजूला केले. मैत्रिणीला मिठी मारत hi, hello करत चालू झालं त्याचं बोलणं म्हंटल चला आपण निघू परत कोणी बघितलं तर पोरीला छेडतो का ? हे असं कोणी म्हणायला नको एकंदरीत Seen तोच झाला होता. आता मी चहाच्या टपरी कडे वळालो चला परत चहा घेऊ सकाळी सकाळीच असा वेगळा अनुभव पहिल्यांदा आला जीवनात. काका परत एक होऊन जाऊ द्या चहा ....... माझी ऑर्डर निघाली आणि खुर्ची घेऊन रोडवर बसलो तिझ्या बद्दल विचार येत होता तिला Sorry म्हणायला पाहिजे होतं मी ? असं अनोळखी मुलीला कोणी थांबवत का कोणी ? माझंचं चुकलं ? आतला माणूस जागा झाला अरे ...... तू मदत केलीस ना ... तिझ्या मैत्रिणीला खरचं तीझ्याशी काही महत्वाचं काम असेन तर, आणि रोज नेहमी एकटी जाते ती आज कुठून तरी तिच्या ओळखीची एक व्यक्ती तिला भेटली कदाचित तू मदत केली नसती तर ती तशीच पुढे गेली असती. चला बाकी काही असो मी चहा घेतो नाही तर परत एक व्हायचां ?