हृदयाला भिडली ही कथा....विमनस्क झालो मी.
आईपण – अंबिका टाकळकर
पुढे कित्येक रात्री झोपेतुन तो किचांळत ऊठायचा,
"माझ्या ह्या हातांनी मी तिला ऑपरेशन थेटर मध्ये नेल...मी मारल तिला...नको होत अस करायला.. जशी होती तशी सांभाळायला हवी होती."
अन घायमोकलून रडत असे. जागीच असलेली त्याची सहचारिणी त्याला शांत करत असे. अन दिवसभर पहाडासारखा ऊभा असणांरा तो क्षर्णाधात कोसळायचा तिच्या कुशीत अन मुसमुसन रडायचा. नुकतीच ऊजाडलेली कोक असुनही ती आई व्हायची त्याची, अन साभांळायची त्याला...मग पहाटे कधीतरी तो शांत झोपायचा अन तिच्या डोळ्यासमोरून मात्र भुतकाळ म्हणण्यापेक्षा नुकतच भग्नलेलं स्वप्न तरळून जायचं. डोळ्यातुन ओघळणांर पाणी पुसत ती ऊठायची अन वत्तल पेटवायची. पेटणा-या धगधगत्या ज्वाळात स्वत:ची धग मोकळी करायची ती ....
अडिच वर्षाची अनामिका अवघी, जन्मत:च पाठीवर एक मोठ्ठा फोड घेऊन जन्माला आली होती. अत्यंत दुर्गम अश्या खेडेगावात कसलीही सोय नसणा-या त्या दोघा नवरा बायकोंना गावातला डाक्टर जवळच्याच शहरात पाठवतो. दोन दिवसाच्या तान्ह्या मुलीला घेऊन ते येतात. बालरोग तज्ञ सांगतात ह्याच ऑपरेशन कराव लागेल. ते करून पाठीवरच्या फोडातल पाणी काढुन टाकाव लागेल. मग तो हळू हळू जिरत जाईलं.
दोघंही जरी सुशिक्षित असले तरीही त्या काळात डॉक्टर म्हणेल ते प्रमाण. ओली बाळंतीण, जनरल वार्डात आपल्या दोन दिवसाच्या तान्हुल्याला घेऊन बसलेली असते. ऑपरेशनची वेळ येते, तो येतो तिच्याकडून त्या बाळाला घेऊन जातो. तिला सोडवत नाही. जबरदस्तीनं तिचा हातातुन सोडवत. ऑपरेशन होतं. बाळ सुखरूप तिच्या कुशीत येतं.
आठ दहा दिवसानंतर ते घरी येतातं. जगरहाटी सुरू होते. छोटुशी तान्हुली हळूहळू मोठी होत असते. मान धरणे, ऊलट पडणे, पुढे सरकणे, रांगणे बसणे, चालणे साधारण बाळाच्या वाढिचे टप्पे. रांगण्याच्या वयात ती रांगतच नाही तेव्हां लक्षात येतं की बाळ असतांना केलेल्या ऑपरेशनमुळे तिच्या नसांवर परिणाम झाला अन् तिचा एक पाय कायमसाठी निकामी झालां. अन परत एकदा आभाळ कोसळत.
हळु हळू एकमेकांना सावरत दिवस जात असतातं. कौलारू घराच्या समोर छोटा ओटा असतो. त्या ओट्यावर ती बसलेली असायची, बाबा आले की, आईला ओरडून सांगायची बाबा आले बाबा आले करत ऊठून त्याच्याकडे धावायचा प्रयत्न करायची पण नियतींन जखडलेलं होतं. तिला अस पाहिलं की ह्याचा जिव आत कुठेतरी तुटायचा, रडु कोसळायचं. ते सावरत मग तो तिच्याशी खेळायचा. अगंणात दुसरी मुलं खेळतांना बघितलं की हिच्या डोळ्यातली अनंत प्रश्न दोघांनाही सतावत. तो तिला जवळ घेत हसवायचा प्रयत्न करत असे. तिला खुश ठेवणं हेच एकमेव त्याच्या जगण्याच कारणं.
एकदा अश्याच कश्मकश्ममध्ये दोन वर्षाच्या अनामिकेनं बाबांना विचारलं, "बाबा, मला कधीच चालता येणारं नाही का? बाबा मला चालायचयं, मला पळायचंय मला ह्या मुलांसारख खेळायचयं." बाबा म्हणुन टाहो फोडला तेव्हां दोघानांही तिला सावरणं कठिण झाल होतं. मनाशी काहीतरी खुणगाठ बांधत तो दर आठ दिवसांनी घेऊन जिल्ह्याच्या डॉक्टराला दाखवायला घेऊन जायचां. एका डॉक्टरांनी सल्ला दिला की हैदराबादला मोठा दवाखाना आहे तिथे चांगले डॉक्टर आहेत. घेऊन जा तिथे दाखवून बघं.
आधीच गरिबी, त्यात जे काही गोळा करून आणतां येईल ते घेऊन अडिच वर्षाच्या अनामिकेला कडेवर घेऊन ते हैद्रराबाद मध्ये, नविन शहर न कोणी ओळखींच न भाषा आपली, सगळच कस परकं. अनोळखी. अनेक डॉक्टराच्या तपासणी नंतर अनामिकेच एक ऑपरेशन करावं लागेल अस डॉक्टर सांगतात. मग तिला चालता येइलं.
शेवटी ऑपरेशनचा दिवस ऊगवतो. आधल्या रात्री त्या जनरल वार्डात आपल्या परिराणीला जवळ घेऊन ती खूप रडते का माहिती नाही पण तिला हे काहीच नको असतं. एक अनामिक भिती तिला भेडसावत असते. माझी अनामिका जशी आहे तशीच हवीय मला, नको हे ऑपरेशन अन नको ती ट्रिटमेंट पण तिचे ओठ हे सांगायला विलग होतच नाहितं. सकाळपासुन तिला काहीही खायला, प्यायला देऊ नका अस सांगीतलेल असतं. आपण चहा प्यायला, काही खाल्ल तर पोर मागेल, म्हणुन काहीही न खाता पिता दोघही बसून राहतातं.
ऑपरेशची वेळ जवळ येते. अनामिकेला स्ट्रेचरवर न्यायला वॉर्डबॉय येतो तेव्हां दोघांच्याही पोटात गोळा येतो. ती नाही म्हणत असते. तो कसाबसा स्वत:ला सावरत लेकीला ऊचलून ऑपरेशन थियेटर पर्यंत नेतो. डॉक्टरांच्या हातात देतो. मागच्या महिन्याभरात इकबाल भाई अन त्याची बायकोची हॉस्पिटलमध्ये ओळख झालेली. तेही कसल्यातरी इलाजासाठी दाखल झालेली. असह्यपणे फे-या मारणा-याला त्याला, इकबाल भाईनं जबरदस्तिनं बसवतो.
साडेचार तासानंतर डॉक्टर बाहेर येतातं अन् नकारार्थी मान हलवत निघुनं जातातं..त्यानंतर वादळ घोगांवतं, कोण कुणाला सावरणांर? अवघ्या अडिच वर्षाचा निष्प्राण जिव घेऊन हैदराबाद ते त्याच गाव असा 400 किमी प्रवास इकबाल भाईन ठरवून दिलेल्या जिपमध्ये वापस घेऊन येतांना त्याच्यातला बाप थिजलेला असतो. अडिच वर्षतल्या अनंत आठवणी तरळून जात होत्या. बाबा ही हाक कानात साद घालत होती. पण तो मात्र दगड झाला होतां.
गावी आल्यावर सगळी तयारी केल्यानंतर निर्जीवपणे त्या कोवळ्या देहाला मातित मिसळतानां तो कोसळतो.....तेव्हां त्याला सावरण शक्यच नव्हंत. पुढे कित्येक रात्री तो झोपेतून किंचाळत ऊठायचा अऩ कोसळायचा, तिच्या कुशीत....
मग आईपणांच दु:ख बाजुला सारून ती त्याची आई व्हायची अन साभांळायची त्याला......पुढचे कित्येक वर्ष!!