किती सहज स्नेहलने लघुतम कथा सांगितली आहे.
कन्यादान – स्नेहल क्षत्रिय
विधी सुरू असताना त्याने ब्राम्हणाला अचानक थांबवले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली. काही वेळाने डोळ्याच्या कडेवरून उंच उडी मारत अश्रूंनी तिच्या गालातल्या गोड खळीला हलकेच मिठी मारली. तिच्या कानात त्याचं मगाचं वाक्य पुन्हा पुन्हा घुमत राहीलं
"मला ‘कन्यादान’ हा शब्द खटकतो आहे "