हीच ती कथा...हेमंतला स्वतःचा नवा शोध लागला.
उंबरठा – हेमंत कोठीकर
लहानपणी आठेक वर्षांची असताना, वडिलांचं बोट धरून, लहान भावासोबत बाहेर जातेवेळी मी उंबरठा ओलांडून ऑटो पकडायला धावली!
तेव्हा वडिलांनी मला हलकेच मागे ओढत म्हटले 'थांब बेटा! ' आणि लहान भावाला म्हणाले, 'जारे, तू आण ऑटो!'
तेव्हापासून आता साठ वर्षानंतरही मी त्याच जागी थबकली आहे. वडिलांची, नंतर नवऱ्याची आणि आता मुलाच्या परवानगीची वाट पाहत.
उंबरठ्याच्या अलीकडे!