फार सुंदर कथा...तरल....'शेवरी' सारखीच
ती शेवरी – अभय नवाथे
व्हिट्रीफाईड फ्लोर, पी.ओ.पी चे लिंपण आणि काच बंद स्लायडिंग खिडक्यांच्या आत सोनू आणि त्याच्या लाडक्या आबांचा स्वैराचार(?) होता!... दुपारच्या तीनच्या अंधारात आराम आटोपून ग्रांडपा tab वर वर्तमान सर्फ करत होते आणि मैदानी खेळ कॅम्प्युटर वर खेळत असलेल्या सोनू कडे लक्ष(?) ही देत होते.
मेट्रो शहराच्या, क्रीम लोक्यालीटीतील, आलिशान स्कीम मधील १८व्या मजल्यावरील ६व्या खोलीतली खिडकी ‘चुकून’ किंचीन उघडी राहिली आणि वाऱ्यानं संधी साधून घुसखोरी केली....प्ले ग्राउंड मध्ये शोभेसाठी लावलेल्या एका शेवरीच्या झाडाची शेंग फुटली....आणि वाऱ्या सोबत तीही ‘ह्यांच्यात’ दाखल झाली....कम्प्युटर मध्ये कधीही न दिसलेली चीज सोनू च्या डोळ्यावरून तरळली आणि कुतूहलानं शेवरी पकडत म्याच्युरड सोनुचा कुतूहली प्रश्न आला..
“ आबा काय हे ???”
“सोनू... ही शेवारीची म्हातारी..खूप मस्त आयुष्य असतं हिचं वाऱ्या प्रमाणे सतत बदलत असतं..”
“ आबा...ही म्हातारी? इतकी वळवळ करतेय तरी हिला म्हातरी का म्हणतात ??”
“स्वप्नांची आस दाखवल्यागत उंच उंच उडत असते आणि खाली आली कि तुझ्या सारख्या लहान मुलांच्या ओंजळीत जाऊन बसते, म्हणून म्हणत असतील...”
“आबा तुम्ही पण लहानपणी पकडायचे हिला?”
“पकडायचो? अरे सोन्या मी वेड्यासारखं धावत सुटायचो हिच्या मागे घरापासून दूरवर कुणाच्या तरी गच्चीत जाऊन मग हाती लागायची. इतका घामगाळून हाती लागल्यावर मी काय करायचो माहित आहे?? या म्हातारीला पुन्हा वाऱ्यावर सोडून द्यायचो. पकडून सोडायचा तो आनंद...
एव्हाना टयाब आणि कम्पुटर दोघांचं स्क्रीनसेव्हर ऑफ झालं होतं... घरभर आता शेवारीची म्हातारी स्वैराचार करत होती, मोह टाळता न आल्याने साचवलेल्या एक एक वस्तूंवर जाऊन आढळत होती...
आबा सोनूच्या वयात स्वतःला पहात होते आणि सोनू आता बाजूला ठेवलेला टयाब खेळायला लागला......