Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

फसवणूक - Shubham Ubarhande

$
0
0

हा मायानगरीचा शाप आहे...सगळे घेते ते..काही ठेवत नाही...काही देत नाही...

फसवणूक - शुभम उबरहंडे

मेकअप-रुम मध्ये एकटाच तो बसला होता. सिगारेट सोबत स्वतःला तो रिलँक्स करत होता. तेवढ्यात दारावरती कुणीतरी आलयं याची चाहुल आल्यामुळे त्याने सिगारेट तशीच विझवली मागे वळुन त्याने बघितलं. त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वासचं बसला नाही. आश्चर्याने तो तिच्याकडे बघत उभा होता. तो तसाच तिच्याकडे काही क्षण बघत राहिला आणि काहीतरी आठवल्या गत अचानक त्याची नजर ही जमीनीवर गेली. त्याला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं की असा प्रसंग त्याच्या समोर येईल. त्याचा भुतकाळ हा त्याच्या समोर येवुन उभा राहील्यामुळे त्याची ही अवस्था झाली होती.थोडी शांतता ही पसरली होती पण तीनेचं पुढाकार घेवुन बोला़यला सुरवात केली. ती :- अरे व्वा..! किती सुंदर दिसतोयस रे तू तो :- (थोडा अल्लड हसत) हम्म् (श्वासातील बदलेली लय जाणवायला लागली होती. योद्धा थोडा गडबडला होता.) तो :- कशी आहेस..? ती :- खुप लवकर विचारतोस.! तो :- म्हणजे ती :- काही नाही तो :- अगं तु उभी का? बस ना! ती :- नको अशीचं बरी आहे मी. तो :- सांग ना काय सुरु आहे तुझं हल्ली? काय करतेस तु सध्या? तु कशी आहेस..? (त्याचं बोलणे सुरु असताचं मध्ये टोकत म्हटली) ती :- तशीचं आहे जसा तु सोडुन गेला होतास ना अगदी तशीचं...! माझं सोड रे, तु कसा आहेस..? तो :- (हसत, हात मोकळे सोडत ) कसा दिसतोय.! ती :- मिळवसं तु? तो :- काय..? ती :- ज्यासाठी तु ऐवढा अट्टहास केला, सारीपाटाचा जमलेला खेळ सुरु होण्याच्या अगोदरचं उद्धवस्त करुन टाकला, ते मिळवसं का तु विचारते आहे मी..! (क्षणार्धात त्याची नजर जमिनीवर सरसावली. बैचनी त्याच्या वागणुकीत जाणवायला लागली होती. थोड्याचं वेळात त्याचा प्रवेश होता. पण मेमरी फॉरमेट मारल्यागत तो सर्व स्क्रिप्ट विसरुन जात होता. घामाने चेहऱ्यावरील मेकअप खराब होत चालला होता) तो :- (खोट हसु आणतं) सोड ना गं त्या जुन्या गोष्टी. ती :- नाही मला खात्री आहे. मिळवलं असेलचं तु सार काही. तो:- तु येथे आज मला डिचवायला आलीस का? (आवाजाची लय बदलत गेलेली) कशाला आलीस तु येथे..? काय शोधायला आलीस तु माझ्याकडे आज..? काय हव आहे तुला.? ती :- मी तुला भेटायला आले रे राजा तो :- हम्म्...! खुप लवकर आलीस ती :- उशीरा का होईना पण मी आले तर खरी. तुला नाही का रे कधी मागे वळुन पाहवसं वाटलं? एकदा ही माझी आठवण नाही आली का रे? या अनोख्या वळणावर तुला कधीचं नाही जाणवला का रे माझा विरह? तो :- जाणवला ना तो तुझा विरह. अनेकदा आठवण सुद्धा आली. पण हा रगंमचं आहे ना, सावरलं त्याने मला सदोदीत. माझ्या चुका सदोदीत आपल्या पदरात सामावून घेतल्यात. अनेक भुमिका जगताना सदोदीत साथ असायचा माझ्या. माझी साकारलेली प्रत्येक भुमिका मग ती एक प्रियकर असो, एक नवरा असो, एक मुलगा असो, की भाऊ असो त्या सर्व भुमीका निभावताना त्या भुमीकेला न्याय देण्याची तळमळ याचं रगंमचाने पाहीलीय. ती:-म्हणजे तु मिळवलं तुला जे हव होतं ते..! तो:- हो सगळ मिळवलं मी. घर, गाडी, बँकबँलन्स, प्रसीद्धी, ऐशोआराम सर्वकाही मिळवलं. ती:- आणि सुख? तो:- (थोडा हसत) याला सुख म्हणत नाही तर कशाला म्हणतात सुख? ती:-( हसत) खरचं मला आत्ता कळुन चुकलं की तु केवढा मोठा कलाकार आहेस. तो:- म्हणजे? ती:- या मायानगरीत तु किता गुरफटुन गेलाय हे कळतंय मला एकदंरीत तुझ्याशी बोलुन. तु या मंचावरील पात्रा सोबत किती एकरुप झालाय दिसुन येतंय. तो:- तुला म्हणायचं तरी काय? ती :- अरे एकदम सरळ आहे. तु या चंदेरी दुनीयेत वावरताना हाडामासाचा या दुनियेचा झालास. तु तुझ्या कल्पनाविश्वात असो की सत्यात दोन्हीकडे तु वावरताना एकसाऱखाचं वागतोय. बोलताना आवाजातील लय न बदलता स्वतःच दु:ख दूर सारत तु स्टेज वर असताना जसा सर्वांच मनोरंजन करतो ना अगदि तसचं खऱ्या आयुष्यात स्वतःचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोयस तु...! सदोदीत तुझ्या मनाची फसगत करतोयस तु, तु आमच्याशी नाही तर स्वतःशी वाईट वागतोयस. तु ज्याला सुख म्हणतोयस ना ते तुझं सुख नाही ते तुझं विरह दुर करायचं साधन आहे. किती वेळ अशी स्वतः ची फसगत करत राहणार आहेस तु अजुन.? ती बोलत जात होती आणि तो अधिक त्या बोलण्यात गुंतत जात होता. त्याचं मन अस्थिर झाल होत. भुतकाळाशी एकरुप होण्याचं प्रयत्न करत होता. पण प्रयत्न सपशेलपणे चुकत होता. भुतकाळ हा वर्तमानात त्याच्यासमोर अगदि ठायी स्वरुपात ठाण मारुन बसल्यामुळे त्याची ही गत झाली होती.

त़्यावेळीचं असणार स्वातंञ आणि आत्ताच्या अदुष्य असलेल्या ह्या परातंञाच्या बेड्या यात तो पूर्णपणे मंञमुग्ध झाला होता. स्वतःच्या निर्णयाचा त्याच्या हक्काच्या म्हणणाऱ्या स्वतःच्या माणसांवर किती परिणाम झाला होता याची त्याला जाणिव होत होती. कानाभोवती मंच्छराची गुणगुण असताना सुद्धा लागणारी सुखाची झोप, या नरमगरम गादिवर ती कुठे गेली याचे उत्तर तो शोधत होता. स्वतःलाच स्वतःसोबत तुलनात्मक नजरेने बघायला लागला.

पावलोपावली या मायानगरीतच्या गालीच्यावरुन जात असताना आपण अस्तित्वापासुन दुर आहोत याची जाणीव त्याला व्हायला लागली होती. पैसा प्रसीद्धी या सर्वापेक्षा मोठी गोष्ट त्याच्याकडे नसल्यामुळे तो अजुनही भिकारीचं होता हे त्याच्या आत्ता लक्षात आल होतं..

मागील काही वर्षात त्याला जे करता आलं नाही ते सर्व काही आज त्याला करावस वाटलं. तो एखाद्या लहानमुलासारखा ओक्साबोक्षी रडायला लागला होता पण माफी मागायला ती समोर नव्हती..!


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles