विदारक सत्य सांगते आहे ही गोष्ट...
साखळदंड – श्रद्धा जगदाळे
नेहाने चौथी सिगारेट शिलगावली, तिच्याकडे रागाने बघत मी तिच्या हातातून ओढून घेत ती विझवली आणि म्हणाले “ये आदत बहोत बुरी है तुम”,. माझ वाक्य तोडत ती म्हणाली “हा पता है it leads to cancer अँड all, ज्यादा भाषण मत झाड enjoy life , वैसे भी अब मै पेहेलेसे कम लेती हूँ..’
ब्रेक संपला मी कॉलेज गेट मधून वर्गाच्या दिशेने धावत गेले, जाता जाता कानांवर आवज आला,
"अगं घरी बसले तर घरचे लग्न लावतील म्हणून येते कॉलेजला". मनातल्या मनात मी सुटकेचा निश्वास सोडला चला इतके तरी वाईट दिवस नाहीत आपले..
वर्गात पोहोचेपर्यंत तो तास off declare झाला होता. मग मी लाँनच्या दिशेने वळले. तेवढ्यात एक मुलगी धापा टाकत येताना दिसली. पाहिलं तर शाळेतली वर्गा मैत्रीण..तिला पाहून मी एक मस्त झप्पी मारली म्हणाले, ‘hii how are you no text , messages,where have you disappeared these days?’, आम्ही canteenchya दिशेने वळलो..ती सांगू लागली, “अरे काय सांगू तुला माझा boyfriend चोवीस तास माझ्याच्यावर watch ठेवून असतो , phone सारखा on ठेवायला सांगतो, shopping, parlour कुठेही जायच असेल तरी माझ्या सोबतच असतो. मी म्हणाले मग आत्ता तुझा फोन चालू आहे का? नाही गं battery संपली आहे म्हणून तर बोलू शकत आहे असं तिने मला सांगताच मला आनंदी आनंद झाला. मी तिच्या boyfriendla शिव्या देत बसले, बघ जरा स्वताकडे इतकी bold dashing कोणाचं ही ऐकून घेत नाही मग त्याचं तरी का ऐकून घेतेस? आमचं संभाषण चालू असताना तो आला. आमचं बोलणं तसंच राहिलं. मी त्याला खोटे स्मित हास्य करून चालू लागले. स्वत:च्या हातावर आणी जिभेवर ताबा ठेवत..मग canteen वरून मी लाँनच्या दिशेने वळले.
एक नव्याने कॉलेजमध्ये आलेल्या ग्रामीण भागातल्या मुलींचा group दिसला. त्यांच्यात जाऊन बसले कोणी assignment पूर्ण करत होत,कोणी मोबाईलमध्ये बघत होत, कोणी ग्रामीण स्टाइलमध्ये serials बद्दल ते अमक्या तमक्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्याबद्दल रंजकपणे सांगत होत..मला जाम कंटाळा यायला लागला. मी अवतीभोवती बघु लागले. देविकाने तिचा नवीन आयटेम शोधला होता. मला क्षमा दिसली मी तिला हाक मारली, "क्षमा तुझी favorite आळु वडी आणली आहे गं" सगळ्या घोळक्यातून बाजूला तिने मला खुणेनेच बोलावलं..मग आम्ही गप्पा मारू लागलो.
नवीन scolarshipschi तिला माहिती देऊ लागले, नवीन जॉब technology इत्यादि, आमच्या गप्पा रंगू लागल्या. मला हीच फार कौतुक वाटायचं. तिची परिस्थिती हालाकीची होती, आपल्या एका नातेवाईकाकडे राहायची. तिला योग्य वागणूक नव्हती मिळत, पण परिस्थितीपुढे काय करणार? घरातली सगळी कामं करून कॉलेजला यायची, फारशी कोणाच्यातच नसायची, कधी चुकून आमची गाठभेट झालीच तर माझ्या जवळ मनमोकळं करायची.
आमचं बोलणं चालू असताना मागून पीयुने आवज दिला, ‘ए चलना बाहेर जाऊन येऊ जरा’. तिला ओके म्हणत क्षमाला bye म्हणत मी निघाले. मी पियुला म्हणाले, ‘काय म्हणतंय सासर तुझ?’ ..ती अनेक गंमती जमती सांगू लागली तिच्या foreign tours ,तिच्या त्यांच भरभरून कौतुक पुराण चालू झालं. नव्या नवरीकडून वेगळं काय ऐकायला मिळणार?. माझी जीवलग मैत्रीण ज्या चक्रव्यूहात अडकली होती त्याची तिला जाणीव नव्हती, तिच्या आवडी निवडीही तिला नेमक्या कळल्या नव्हत्या, शंभर माणसांच तिचं, नवीन तालेवार एकत्र कुटूंब, कॉलेज संपल्यावर तिचं आयुष्य घरकामातच जाणार होतं. तसं ती भरपूर फिरू शकणार होती,फक्त बाहेर जाताना थोडे वेस्टर्न कपडे घालू शकणार होती, घरी असताना मात्र साड़ी,आणी डोक्यावरचा पदर खाली न पाडता वावरावं लागणार होतं आयुष्यभर, २०१७ साली सुद्धा पण छंद जोपासू शकणार नव्हती.
India vs भारत एकाच ठिकाणी बघत होते. एकीकडे महिलांवरचे रोज होणारे आत्यचार, त्यांच सहन करण, gas असणाऱ्या घरात अजून ही stove चा भड़का उडून दहा घरां मागे एक तरी बाई गेल्याची घटना घडल्याचे कानावर येतेच. एकीकडे बाईची भाईगिरी डोळ्यांसमोर येते..आणि भरडल्या जातात बऱ्याच वेळा थोडी परंपारिकता जपत उंच झेप घेण्याची स्वप्न बघणाऱ्या मुली दोन्ही टोकांच्या कचाटयात न पडता सुर्वणमध्य साधत असताना, काळजीच्या पिंजर्यात, सुरक्षेच्या साखळदांडाने कैद झालेल्या असतात कधी कधी –