Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Mi Asen Nasen - Bhagyashree Bidkar

$
0
0

आपण नेहमी आपल्या दुसऱ्याच्यामध्ये दिसलेल्या आपल्या प्रतिमेवर प्रेम करीत असतो....

मी असेन नसेन – भाग्यश्री भोसेकर बिडकर

हे बघ आत्ता या क्षणी मी आहे...आपण आहोत. सगळं कसं जिथल्या तिथे... समोरच्या पेनस्टॅन्ड पासून अवकाशातल्या ब्रम्हांडापर्यंत.पण म्हणून कसलीच शाश्वती देता येत नाही ना रे...आत्तापर्यंत जगलोच की आपण अशाश्वत भरवश्याची पट्टी डोळ्यावर बांधून...खूप खूप सुखात...आताही आनंदातच आहोत पण एक सांगायचंय..अगदी एकच...ऐकशील ना...

सख्या उद्या.. आज सुर्यास्तावेळी.. अगदी पुढच्या क्षणी मी असेन नसेन तू असाच खळखळून हसत रहा...भिरकावून दे जगाचा, जगासाठी जपलेला मुखवटा..तू बिनधास्त, बेधडक जगत रहा...रच स्वप्नांचे मनोरे...सर कर पुढच्या लढाया...चुकाही कर..धडपड जरासा..... असाच प्रेम व्यक्त करत रहा.. कधी कधी असमाधानी होऊन धगधगत रहा..ह्या धगधगण्याची ऊब तुला पुढे चालण्याची ऊर्जा देईल...कधी वाटाड्या हो तर कधी पायाखालची वाट बन..पण पुढे चालणं थांबवू नकोस कधीच...फार फार बाबतीत आपण अवलंबून आहोत नं एकमेकांवर? झुगारुन दे हे सगळं..अरे पाहतोस काय असा? अगदी चालेल मला...अख्खा दिवस अंगावर येईल पण तू नव्या वाटा शोधून पुढच्या प्रवासदिंडीची तयारी कर...सोबत काळजीही घे स्वतःची.कधी शांत बस..त्या क्षणात जग...काही निसटू दे..काही घट्ट पकडून ठेव.

कधीतरी आठव मला...हेही अगदी चालेल..अहं आवडेल मला...पण डोळ्यात आसवं ठेवून नको तर मनात आनंदाचं झाड फुलवून. बावळट/वेडी म्हण मला...खूप खूप रागाव... मस्त मिठी मार तुझ्यातल्या मला...सरीवर सरी बरसतील तू त्यात मनोसोक्त भिजत रहा...प्रत्येक क्षणात भरभरून जगत रहा

...बस्स इतकंच सांगायचं होतं....


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>