Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

पडीक जमीन - Niranjan Bhate

$
0
0

दाहक वास्तवाचे क्यामेरात टिपलेल चलत चित्र....भन्नाट...!!

“पडीक जमीन....” – निरंजन भाटे

झुंजूमुंजू व्हायच्या आत नहाण उरकून सोनसळी जरी काठाचं हिरवंकंच लुगडं नेसून उगवता सूर्य कपाळावर ठसठशीत रेखून दिवस सुरू व्हायचा तिचा....

भरल्या गोकुळावरून नजर फिरवताना तिचा इवला जीव सुपाएवढा व्हायचा हरकून जायचा अगदी....

दळण कांडण,सकाळची न्याहरी, सारवण दुपारची जेवणं घेऊनशेतावर जाणं....

तो छोटासाच सोन्याचातुकडा तिला अपार बळ देत असे....

सांच्याला बापये माणसं परत येत शेतावरून तेंव्हा मुलं बुकं वाचित बसलेली असत ओसरीवर ग्यासबत्तीच्या प्रकाशात... धनी त्यांना दरडावित असे, “बुकं शिकून मोठं अंमलदार व्हा रं पोरांनो, शेती म्हंजी वैऱ्याचा डाव......”

तिला वाटायचं, पुढं येऊन बोलावं काही... पण ओसरीवर येऊन कधी बोलली नाही ती...

सदा सर्वकाळ सारं काही आलबेल होतं असं नाही अनेक अवर्षणं परतवली तिनेही.. उसन्या पाण्यावर, धन्याच्या संगतीनं... पण गोकुळाचं हिरवेपण कमी होऊ दिलं नाही...

मुलं मोठी झाली... त्यांचे संसार जमले, गोकुळ विस्तारलं आहे, पांगलंय म्हणानात...

तिच्या डोळ्यातही आता फुल पडलं आहे... आता ती बसून असते.... अंधाऱ्या खोलीच्या ओसाडीत.... पडीक जमीनीप्रमाणे...

वेळावेळाने डोकावतात तिच्या खोलीत... तिने फार काही बोलू नये या अपेक्षेनेच... पडीक जमीनीप्रमाणेच.....


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>