विनया पिंपळे हिची लघुतम कथा एका वैश्विक सत्याला स्पर्श करते आहे.
वजाबाकी – विनया पिंपळे
बाईंनी कितीतरी वेळ परत परत त्याला वजाबाकी शिकवली; पण ती त्याला काही केल्या समजेना.
मग बाई म्हणाल्या-
"दवडीत चार भाकरी होत्या त्यातल्या तू दोन खाल्ल्या तर दवडीत किती उरल्या?"……
तो पट्कन उत्तरला- "दोन !"
त्यानंतर वजाबाकीची कितीतरी उदाहरणं त्यानं पटापट सोडवली.
त्यानिमित्तानं का होईना...दवडीतल्या कितीतरी भाकरी मनसोक्त खाल्ल्या. कुठलंही गणित भुकेशी जोडलं की पटकन सुटतं... नाही का??